शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

शहरातील आठ प्रमुख मार्गांवर प्रत्येक मिनिटाला एक, तर अन्य तीन मार्गांवर दर दोन मिनिटाला एक बस धावेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 05:12 IST

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे (पीएमपी) शहरातील आठ प्रमुख मार्गांवर प्रत्येक मिनिटाला एक, तर अन्य तीन मार्गांवर दर दोन मिनिटाला एक बस धावेल, असे नियोजन करण्यात आले आहे. या शिवाय गर्दीच्या वेळी बसची संख्या वाढवणे, काही मार्गांच्या फेºयांत वाढ करणे आणि काही बसचे मार्ग वाढविण्यात आले आहेत. या बदलाची ...

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे (पीएमपी) शहरातील आठ प्रमुख मार्गांवर प्रत्येक मिनिटाला एक, तर अन्य तीन मार्गांवर दर दोन मिनिटाला एक बस धावेल, असे नियोजन करण्यात आले आहे. या शिवाय गर्दीच्या वेळी बसची संख्या वाढवणे, काही मार्गांच्या फेºयांत वाढ करणे आणि काही बसचे मार्ग वाढविण्यात आले आहेत. या बदलाची अंमलबजावणी देखील सुरू झाली असल्याची माहिती पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.कात्रज-स्वारगेट, स्वारगेट-शिवाजीनगर, मनपा भवन-निगडी, औंध-डांगे चौक, येरवडा-खराडी बायपास रस्ता, महात्मा गांधी स्थानक-हडपसर रस्ता, डेक्कन-वारजे-माळवाडी आणि डेक्कन ते कोथरूड या मार्गावर दर मिनिटाला एक बस धावेल, असे नियोजन करण्यात आले आहे. सिमला आॅफिस ते हिंजवडी रस्ता, कासारवाडी ते भोसरी रस्ता आणि संगमवाडी येथे विश्रांतवाडी रस्त्यावर दर दोन मिनिटाला बस धावेल. या अकरा मार्गावर एकूण १ हजार ५८२ बस १७ हजार ९६८ फेºया दर दिवशी करतील. या शिवाय शनिपार, अप्पर, स्वारगेट, कोथरूड, भारती विद्यापीठ अशा विविध १६ मार्गांवरील बसची संख्या एकपासून पाचपर्यंत वाढविण्यात आली आहे. या मार्गांवरील बसची संख्या ८० वरून ११४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. गर्दीच्या १९ मार्गांवरील बसच्या संख्येत २१८ वरून ३२१ पर्यंत वाढ करण्यात आली असून, येथील खेपा १ हजार ९९ होतील.पास दरवाढीनंतर उत्पन्न कायमज्येष्ठ नागरिक आणि इतर पासच्या दरात वाढ केल्यानंतरही पासचे दर दिवसाचे उत्पन्न २४ ते २५ लाख रुपयांच्या घरातच आहे. तसेच, प्रवाशांच्या संख्येतही वाढ होत आहे.या मार्गांवरील बसच्या संख्येत झाली वाढमनपा-तळेगाव, भेकराईनगर-आळंदी, शेवाळवाडी-पिंपळे गुरव, कात्रज-हडपसर, कात्रज-भोसरी, पुणे स्टेशन-हिंजवडी फेज ३, भेकराईनगर-चिंचवडगाव, वज्र २ वारजे माळवाडी-वाघोली, शेवाळवाडी- पिंपरी पालिका, मनपा भवन-कोंढवा गेट, कात्रज-चिंचवड, वारजे-माळवाडी-चिंचवड, निगडी-भक्ती-शक्ती धायरी, कोथरूड डेपो-कात्रज, हडपसर-वारजे माळवाडी, आकुर्डी रेल्वे स्टेशन- वारजे-माळवाडी, कात्रज-महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, हडपसर-हिंजवडी माण फेज ३, स्वारगेट-विश्रांतवाडी या मार्गावरील बसची संख्या २१८ वरून ३२१ झाली आहे. या मार्गांवर बसच्या एकूण एक हजार ९९ खेपा होतील.बोनसचा निर्णय पीएमपी घेईलपीएमपीमधील पीएमटी कर्मचाºयांना बोनस देण्यात यावा, असा ठराव पुणे पालिकेच्या स्थायी समितीने केला आहे.कर्मचाºयांना बोनस देण्याचा अंतिम निर्णय पीएमपीच घेईल, अशा शब्दांत पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी बोनसच्या निर्णयावर भाष्य केले.महिलांसाठी ७ मार्गांवर विशेष बसमहिलांसाठी भोसरी-मनपा भवन (बस क्रमांक ३१५ ), निगडी-मनपा भवन (१२३), कात्रज-शिवाजीनगर (२), भेकराईनगर-मनपा (१११), कात्रज-महाराष्ट्र हौसिंग बोर्ड (२४), वारजे-माळवाडी मनपा (८२) आणि धनकवडी-न.ता.वाडी (३८) अशा ८ बस धावतील. यातील कात्रज ते शिवाजीनगर या मार्गावर दोन बसच्या२४ फेºया होतील.गरज आणि व्यवहारिकता या कसोटीवर बसमार्गांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. प्रत्येक मार्गावरील प्रवाशांची संख्या, गर्दीचा कालावधी लक्षात घेऊनच विविध मार्गावर बस वाढविण्यात आल्या आहेत. याच निकषानुसार बससंख्या, बसच्या खेपा वाढविण्याबाबत निर्णय घेतला जाईल. सध्या १५०० बस रस्त्यावर असून, ही संख्या लवकरच १५५० पर्यंत नेण्यात येईल. - तुकाराम मुंढे, व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी ं

टॅग्स :Puneपुणे