शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे रेल्वे स्थानकावर चेंगरा चेंगरीत एकाचा मृत्यू; दिवाळी सुट्टीत गाड्या न वाढविल्याचा परिणाम

By विवेक भुसे | Updated: October 22, 2022 23:28 IST

पुणे - दानापूर या बाराही महिने भरून वाहणार्या रेल्वेगाडीत चढताना झालेल्या चेंगराचेंगरीत एका प्रवाशाचा मृत्यु झाला. ही घटना पुणे रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.

पुणे :

पुणे - दानापूर या बाराही महिने भरून वाहणार्या रेल्वेगाडीत चढताना झालेल्या चेंगराचेंगरीत एका प्रवाशाचा मृत्यु झाला. ही घटना पुणे रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, या चेंगराचेंगरीत आणखी एक जण गाडीखाली सापडल्याचे सांगण्यात येतेबौधा मांजी ऊर्फ यादव (वय २१) असे मृत्यु पावलेल्या प्रवाशाच्या नावे आहे. याबाबत रेल्वे पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी सांगितले की, पुणे -दानापूर ही रेल्वे गाडी पुणे स्थानकावरील प्लॅटफाॅर्म १ वर येत होती. त्यावेळी जनरल डब्यात चढत असताना एका प्रवासी खाली पडला. त्यात तो बेशुद्ध झाला असून त्याला रेल्वे पोलिसांनी तातडीने ससून रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पुणे - दानापूर या गाडी १२ ही महिने हाऊसफुल्ल असते. असे असतानाही यंदा दिवाळीच्या काळात मध्य रेल्वेने बिहारकडे जाणार्या गाड्यांमध्ये वाढ केली नाही. दानापूर गाडीला सुरुवातीला व शेवटीची असे प्रत्येकी २ -२ अनारक्षित डबे असतात. या डब्यांमध्ये जागा मिळविण्यासाठी प्रचंड गर्दी होत असते. गाडी प्लॅटफॉर्मला लागत असताना शेवटच्या २ डब्यांमध्ये चढण्यासाठी प्रचंड चेंगराचेंगरी झाली. त्यात मांजी हे खाली पडले. त्यांच्या अंगावरुन लोक डब्यात चढत होते. त्यात ते बेशुद्ध पडले. प्लॅटफॉर्म वरील लोकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी रेल्वे पोलिसांना कळविले. त्यांना प्रथमोपचार देण्याचा प्रयत्न केला. नंतर ससून रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यु झाल्याचे घोषित करण्यात आले.

बिहारकडे जाणार्या गाड्यांना नेहमीच प्रचंड गर्दी असते. त्यात दिवाळीत लोक घरी जाण्यासाठी या गाडीसाठी आले होते. गरीब कामगार, कष्टकरी प्रवाशांकडे रेल्वे नेहमीच दुर्लक्ष करुन एसी डबे वाढविले. त्यामुळे गावाकडे जाणार्या कष्टकर्यांचे मोठे हाल झाले. त्यातूनच आज चेंगराचेंगरी होऊन एका प्रवाशाला आपले प्राण गमवावे लागेल.

टॅग्स :Puneपुणे