शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

मंचरला एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण

By admin | Updated: April 15, 2017 03:46 IST

येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या दुरवस्थेच्या निषेधार्थ शुक्रवारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. नागरिक व स्वयंसेवी संस्थांनी उपोषणात सक्रिय

मंचर : येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या दुरवस्थेच्या निषेधार्थ शुक्रवारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.नागरिक व स्वयंसेवी संस्थांनी उपोषणात सक्रिय सहभाग घेतला. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सायंकाळी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. उद्या आरोग्य संचालक यांच्याबरोबर बैठक घेऊन येथील समस्या मांडल्या जातील, असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडले. मंचर उपजिल्हा रुग्णालयातील सुविधा बहुतांशी बंद आहेत. रुग्णालयातील दुरवस्थेचा निषेध करत आज एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. रुग्णालयाच्या बाहेर पंडाल टाकून उपोषणकर्ते उपोषणाला बसले होते. सकाळी उपोषणाला सुरुवात झाली. अनेक नागरिकांनी उपोषणस्थळी येऊन या उपोषणाला पाठिंबा दिला. ७२ स्वयंसेवी संस्थांनी उपोषणाला पाठिंबा दिला असून, तसे पाठिंब्याचे पत्र संस्थांच्या वतीने देण्यात आले आहे. डॉ. प्रमोद बाणखेले व अ‍ॅड. राहुल पडवळ यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण झाले. या वेळी हभप शंकरमहाराज शेवाळे, युवराज बाणखेले, डॉ. मंगेश बाणखेले, शरदराव शिंदे, शरदराव पोखरकर, घोडेगाव वकील संघाचे सचिव अ‍ॅड. सुदाम मोरडे, अ‍ॅड. नीलेश शेळके, उद्योजक अजय घुले, खरेदी-विक्री संघाचे संचालक पांडुरंग पाटील, बादशाह इनामदार, पंढरीनाथ बारवे, प्रवीण मोरडे, नरेंद्र गुरू थोरात, जि. प. सदस्य अरुणा थोरात, सुषमाताई शिंदे, ग्रा. पं. सदस्य कविता थोरात, लक्ष्मण भक्ते, डॉ. सदानंद राऊत, डॉ. वैभव सुपेकर, अल्लू इनामदार, संजय बाणखेले, डॉ. सीमा खिवंसरा, दत्ता थोरात, सुषमाताई शिंदे आदी उपस्थित होते. सायंकाळी दिलीप वळसे पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यांच्या समवेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, उपसभापती गणपतराव इंदोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा देशमुख, गटविकास अधिकारी राहुल काळभोर आदी होते. (वार्ताहर)मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयाला यापूर्वी आनंदीबाई जोशी राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. रुग्णालयात काही त्रुटी जरूर निर्माण झाल्या आहेत. त्यामुुळे रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांची असुविधा होते. त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो.- दिलीप वळसे पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष