शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातहून विक्रीसाठी आलेला दीड कोटी रुपयांचा गुटखा जप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 21:15 IST

चाकणजवळ शुक्रवारी पहाटे चार वाजता ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सात जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथून हा माल आला आहे.  

ठळक मुद्देगुरुवारी रात्री मोठ्या प्रमाणात गुटखा येणार असल्याची पोलिसांना माहितीआरोपींकडून गुटखा पानमसाल्याचा १ कोटी ४७ लाख ४२ हजार रुपयांचा आणि सुगंधित तंबाखूचा २३ लाख ३८ हजार रुपयांचा साठा जप्त

पुणे: शहर व ग्रामीण पोलीस, अन्न आणि प्रशासन प्रशासनाने (एफडीए) केलेल्या संयुक्त कारवाईत पावणेदोन कोटी रुपयांचा गुटखा आणि सुगंधित तंबाखूची वाहतुक करणारे ट्रक ताब्यात घेतले. चाकणजवळ शुक्रवारी पहाटे चार वाजता ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सात जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथून हा माल आला आहे.  पंकज बलदोटा (रा.आळंदी) व गणेश बोराटे (रा.देहु रस्ता), दिपक मोर्या (वय २४, उत्तरप्रदेश), रेशनु सरोज (वय २५, रा.उत्तरप्रदेश), मनोज यादव (वय ३० ,रा.उत्तरप्रदेश), संतोष चौरासिया( रा. उत्तरप्रदेश) व निलेश बोराटे(वय ३२,रा.मॉर्डन महाविद्यालयाशेजारी) अशी आरोपींची नावे आहेत. राज्यात बंदी असलेल्या गुटखा व पानमसाल्याची बेकायदा वाहतुक होत असल्याची माहिती पोलीसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. आळंदीतील पंकज बलदोटा व त्याचे साथीदार हे संघटीतपणे बेकायदा गुटखा विक्री करत असल्याचे पोलिसांना समजले होते. त्याच्यावर मागील दोन महिन्यांपासून अंमली पदार्थ विरोधी पथकाची पाळत होती. बलदोटा हा गुजरात व कर्नाटक राज्यातून गुटखा विक्रीसाठी आणत होता. पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे व त्यांच्या पथकाने बलदोटाची गुटखा विक्रीच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली होती. गुरुवारी रात्री मोठ्या प्रमाणात गुटखा येणार असल्याची माहिती पोलिसांना होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक दोरगे, पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, सहायक पोलीस निरीक्षक एस.बी.पाटील, पोलीस उपनिरीक्षक औटे यांनी सापळा रचून आरोपींना जेरबंद केले. शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास चाकण कुरळी फाटा येथील हिंदुस्तान पेट्रोल पंपावर आरोपी संशयीतरित्या उभे होते. त्यांच्या चार ट्रकची तपासणी केली. असता त्यात गुटखा व सुगंधीत तंबाखूचा साठा आढळला. दरम्यान हे ट्रक ताब्यात घेतल्यावर ते सोडवण्यासाठी निलेश बोराटे हा आला होता. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने पंकज बलदोटा व गणेश बोराटे यांनी हा गुटखा मागवला असल्याचे सांगितले. याची विक्री पंकज बलदोटा जिल्ह्यातील  विविध दुकानदारांना करीत असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडून गुटखा पानमसाल्याचा १ कोटी ४७ लाख ४२ हजार रुपयांचा आणि सुगंधित तंबाखूचा २३ लाख ३८ हजार रुपयांचा साठा आणि ६० लाख रुपयांची वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती एफडीएचे पुणेचे सहायक आयुक्त ए. जी. भुजबळ यांनी दिली.   

टॅग्स :moshiमोशीCrimeगुन्हाDrugsअमली पदार्थ