शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा न्यायालयाच्या विस्तारासाठी येरवड्यात एक एकर जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 19:53 IST

विस्तारासाठी जागा मिळण्याबाबत जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी २०१७ मध्ये अर्ज केला होता.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी यांनी विनामुल्य व कब्जे हक्काने येरवडा येथील जागा विधी व न्याय विभाग यांना देण्याचा आदेश जारी तीन वर्षांच्या आत मंजूर हेतूसाठी जागेचा वापर सुरू करणे बंधनकारक राहणार

पुणे : वाढत्या खटल्यामुळे सध्याची जागा कमी पडत असल्याने पुणे जिल्हा न्यायालयाच्या विस्ताराकरीता येरवडा येशील एक एकर जागा देण्याचा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने काढला आहे.विस्तारासाठी जागा मिळण्याबाबत जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी २०१७ मध्ये अर्ज केला होता. त्यात येरवडा आणि शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयातील जागांची मागणी करण्यात आली होती. त्याबाबत तहसिलदार यांनी चौकशी आहवाल सादर केला. त्यात येरवडा येथील जागेच्या सातबारा उताऱ्यावर कब्जेदार सदरी सरकार अशी नोंद असून ती न्यायालयाच्या विस्तारासाठी देण्यास देण्यास हरकत नसल्याचे कळविले होते. याप्रकरणी विधी व न्याय विभाग, नगर विकास विभाग, वित्त विभाग यांनी दिलेल्या अभिप्राय अनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसूल संहितानुसार पुणे जिल्हा न्यायालयाच्या विस्ताराकरिता येरवडा येथील एक येकर जागा विधी व न्याय विभागास विमामुल्य देण्यास हरकत नसल्याचे कळविले. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी विनामुल्य व कब्जे हक्काने येरवडा येथील जागा विधी व न्याय विभाग (जिल्हा न्यायालय पुणे) यांना देण्याचा आदेश जारी केला आहे.   या जागेत पुढील ५० वर्षांचा विचार करून न्यायालयासाठी आवश्यक असलेल्या बाबी उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. जागा देताना जिल्हा प्रशासाकडून अटी व शर्ती घालण्यात आलेल्या आहेत. महसूल व वन विभागाच्या पूर्व परवानगीशिवाय सदर जमीन किंवा तिचा कोणताही भाग विक्री, देणगी देवून, गहाण किंवा खासगी सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर हस्तांतरीत करता येणार नाही. तसेच तीन वर्षांच्या आत मंजूर हेतूसाठी जागेचा वापर सुरू करणे बंधनकारक राहणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयYerwadaयेरवडा