शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

पुन्हा 'योगायोग';अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एकत्र येणार

By दीपक अविनाश कुलकर्णी | Updated: December 31, 2020 12:32 IST

दोन्ही नेत्यांकडून कशी राजकीय फटकेबाजी केली जाते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील वर्षी पहाटेच्या वेळी अचानक शपथविधी उरकून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली होती. मात्र ते सरकार अवघ्या ८० तासांसाठी अस्तित्त्वात राहिले. त्यानंतर पुन्हा अजित पवारांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तेव्हापासून अर्थ खात्याची महत्वाची जबाबदारी सांभाळत पवार यांचे काम धडाक्यात सुरु आहे. पण पुन्हा एकदा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एकत्र येणार असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. पुण्यातील कार्यक्रमात हे दोन दिग्गज नेते एकाच मंचावर उपस्थित असणार आहे. त्यावेळी नक्कीच दोन्ही नेत्यांकडून कशी राजकीय फटकेबाजी केली जाते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.   पुणे महापालिकेच्या ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पा’ चे लोकार्पण नववर्षाच्या पहिल्याच दिवशी होणार आहे. १ जानेवारी,२०२१ रोजी या प्रकल्पाचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. महापालिकेच्या नवीन इमारतीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दुपारी चार वाजता या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पर्यावरण, वने व माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे , भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीष बापट उपस्थित राहणार आहेत़ तसेच यावेळी जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, माजी आमदार उपस्थित असतील. 

पवार- फडणवीस यांच्याबाबत या अगोदर दोनदा आला 'असा' योगायोग.. राज्यातील फडणवीस सरकार यांचे ८० तासांचे सरकार पडल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले. त्यात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर काही दिवसातच माढा येथील लग्न समारंभात अजित पवार व देवेंद्र फडणवीस हे शेजारी शेजारी बसलेले पाहायला मिळाले होते. तसेच त्यावेळी दोघांत हास्य विनोद झालेले देखील दिसले होते. तसेच दुसऱ्यांदा पवार आणि फडणवीस हे बाणेर येथील कोविड सेंटरच्या उद्घाटनासाठी एकत्र आले होते. त्यावेळी देखील अजित पवार व फडणवीस यांच्यात चांगलीच राजकीय जुगलबंदी रंगलेली पाहायला मिळाली होती. 

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारPoliticsराजकारणMayorमहापौर