शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

Omicron Variant: ओमायक्रॉन आला पुण्यात; तुम्ही लस घेतली आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 12:36 IST

पुणे : दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने आता जिल्ह्यात प्रवेश केला आहे. यामुळे प्रशासन सज्ज झाले आहे. ...

पुणे : दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने आता जिल्ह्यात प्रवेश केला आहे. यामुळे प्रशासन सज्ज झाले आहे. सतर्कतेचा उपाय म्हणून लसीकरणाला प्राधान्य दिले जाणार असून, नागरिकांनी लवकरात लवकर आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केली आहे. जिल्ह्यात लसीकरण पूर्ण करण्यासाठी ‘घर घर दस्तक’ मोहिमेला मुदतवाढ देण्यात आली आहे. मास्क आणि शारीरिक नियमांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

जिल्ह्याच्या वेशीबाहेर असलेला कोरोनाचा नवा व्हेरिअंट हा जिल्ह्यातही येऊन धडकला आहे. रविवारी जिल्ह्यात ७ रुग्ण आढळले. हा विषाणू नवा असला तरी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या विषाणूविरोधात लढण्यासाठी लसीकरण गरजेचे असून, नागरिकांनी दोन्ही डोस प्राधान्याने पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्राथमिक उपाय म्हणून सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर शारीरिक अंतराचे पालन करणे गरजेचे आहे. त्यासोबतच हाताचे निर्जंतुकीकरण करणे महत्त्वाचे आहे. हा विषाणू नवा असला तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. शासकीय नियमावलीचे पालन केल्यास या विषाणूपासून दूर राहता येते, अशा सूचना आरोग्य विभागातर्फे करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत ३४ लाख ४ हजार ८०१ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर १४ लाख ३१ हजार ४९८ जणांनी दोन्ही डोस घेतले आहे. हर घर मोहिमेला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी २ हजार ४१० जणांचे पथक जिल्ह्यात अहोरात्र झटत आहे. घरोघरी जाऊन हे पथक लसीकरणासाठी जनजागृती करत असून, लसीकरणापासून वंचित राहिलेल्यांचे लसीकरण पूर्ण करुन घेत आहेत. ग्रामीण भागात २९५ केंद्रांवर लसीकरण केले जात आहे.

पहिला डोस    दोन्ही डोस

हेल्थकेअर वर्कर- १,६२५७४ १,४१,०९०

फ्रंटलाइन वर्कर- २,६९,२७३ २,३३,२१०

१८ ते ४४ वयोगट- ४७,९५,१३६ २५,३६,४७३

४५ ते ५९ वयोगट -१६,२४, ६९४ ११, ५४,१७४

६० पेक्षा जास्त- १२,०४,३३५ ९,१०,१७२

तालुकानिहाय झालेले लसीकरण

तालुका  पहिला डोस  दुसरा डाेस

हवेली  ६२५२०९  ४९२०५८

खेड  ३५१६२४ १७६६४०

शिरूर  ३०६३०५ १५४०२१

मावळ २९८४४९ १३४९४३

जुन्नर २६८८०८ १३६४२०

बारामती  २५९८९१ १३६७५६

इंदापूर  २३५३५२  ९६८४३

दौंड  २२७८६३  ११३८५२

मुळशी  २१८१८४ १५६७१५

आंबेगाव  १७८१८९  ९४८३८

पुरंदर  १५३९७८ ७४६२७

भोर  ९८२१३  ५०७२०

वेल्हा  ४४०५४  २३०७६

जिल्ह्यात आलेल्या ओमॅक्राॅन विषाणूपासून दूर राहण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. नागरिकांनी स्वत:हून पुढे येत लसीकरण करणे गरजेचे आहे. लसीकरण पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत हरघर दस्तक मोहिमेची मुदत वाढवण्यात आली आहे.

-आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडOmicron Variantओमायक्रॉन