शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

OMG! ... तर पुण्यातील अनेक पेट्रोल पंप ठेवावे लागणार बंद; 'हे' आहे त्यामागचे खास कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 14:30 IST

साधे पेट्रोलचा दर १०० रुपये झाल्यास एका कंपनीच्या जवळपास सर्वच पेट्रोल पंपाना बंद ठेवण्याची पाळी येणार आहे.

विवेक भुसे- 

पुणे : पेट्रोलची दरवाढ गेल्या काही दिवसांपासून वेगाने शंभरीकडे जात आहे. प्रीमियम पेट्रोलचे तर आताच शंभरापर्यंत पोहचले आहेत. प्रीमियम पेट्रोलचे दर शंभरावर पोहचल्यावर पुण्यात अनेक ठिकाणच्या पेट्रोल पंपावरील युनिटमध्ये १०० आकडा येऊ शकत नाही. त्यामुळे ते युनिट पेट्रोल पंपचालकांना बंद ठेवावे लागणार आहे. साधे पेट्रोलचा दर १०० रुपये झाल्यास एका कंपनीच्या जवळपास सर्वच पेट्रोल पंपाना बंद ठेवण्याची पाळी येणार आहे.

पेट्रोलचे दर सध्या दररोज बदल आहेत. त्यानुसार सकाळी पेट्रोल पंप सुरू करताना तेथील पेट्रोल व डिझेलचा पुरवठा करणाऱ्या सर्व युनिटचे कॅलिब्रेशन करून नवीन दर त्यात फीड करावे लागतात. पेट्रोलचा दर जर शंभर रुपये झाला तर तो दर या मशिनवर फीड करता येईल का याचे प्रात्याक्षिक एका पेट्रोल पंपावर घेण्यात आले. त्यात जे युनिट डिजिटल आहे. त्या ठिकाणी १०० आकडा फीड करता येतो. मात्र, ज्या पेट्रोल पंपावर टॅट सुनो ही प्रणाली वापरत आहेत. त्या पेट्रोल पंपावरील युनिटमध्ये १०० आकडा टाईपच करता येत नाही. त्यामुळे या युनिटवर १०० आकडा येत नसल्याने त्यावरून पेट्रोल वितरण करता येणार नसल्याचे सध्याच्या परिस्थितीत दिसून येत आहे.

पुणे जिल्ह्यात जवळपास ५५० पेट्रोल पंप असून अनेक ठिकाणी टॅट सुनो ही प्रणाली वापरण्यात येत आहे. त्या ठिकाणी शंभर आकडा युनिटवर येत नसल्याने पेट्रोल पंपचालकांना तशी युनिट बंद ठेवावी लागणार आहे. आज पेट्रोलचा दर ९५.३९ रुपये प्रतिलिटर आहे. त्याचवेळी पॉवर पेट्रोलचा दर प्रतिलिटर ९९.०७ रुपये झाला आहे. पेट्रोलचा दर साधारण दररोज २५ ते ३० पैशांनी वाढत आहे. तो असाच वाढत राहिला तर, पॉवर पेट्रोलचा दर पुढील ३ ते ४ दिवसांत शंभर रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. राज्यात परभणी, नांदेड येथे तर तो आताच शंभरावर पोहचला आहे. पेट्रोलचा दर शंभर रुपये झाला तर अनेक पेट्रोल पंपावर ही समस्या निर्माण होणार आहे

टॅग्स :PuneपुणेPetrol Pumpपेट्रोल पंपPetrolपेट्रोलState Governmentराज्य सरकार