शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या वाहनांना ‘जीपीएस’ची सक्ती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 16:37 IST

केंद्रीय मोटार वाहन नियमामध्ये काही बदल करून प्रवासी वाहनांना जीपीएस यंत्रणा व आपत्कालीन बटन बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

ठळक मुद्देयामधून दुचाकी, रिक्षा ही वाहने वगळण्यात आली आहेत.आरटीओकडून याबाबत परिपत्रक प्रसिध्द करून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू

पुणे : प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनांमध्ये व्हेईकल ट्रॅकिंग यंत्रणा (जीपीएस) व आपत्कालीन बटन बसविण्याची सक्ती मागे घेण्यात आली आहे.  दि. १ एप्रिलपूर्वी उत्पादित, विक्री व नोंदणी झालेल्या वाहनांना ही उपकरणे बसविण्याची सक्ती नसल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने स्पष्ट केले आहे.केंद्रीय मोटार वाहन नियमामध्ये काही बदल करून प्रवासी वाहनांना जीपीएस यंत्रणा व आपत्कालीन बटन बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. या बदलाची अंमलबजावणी दि. १ एप्रिलपासून सुरू झाली आहे. आरटीओकडून याबाबत परिपत्रक प्रसिध्द करून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. यामधून दुचाकी, रिक्षा ही वाहने वगळण्यात आली आहेत. मात्र, निर्णयाची अंमलबजावणी करण्यापुर्वी वाहन मालकांना संबंधित उपकरणे बसविण्याबाबत पुरेसा वेळ देण्यात आलेला नाही. या बदलाची अनेकांना माहितीही नाही. त्यामुळे अशापध्दतीने अचानक अंमलबजावणी करणे चुकीचे असल्याने ही सक्ती रद्द करावी, अशी मागणी काही संघटनांनी केली होती.या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने सर्व आरटीओ कार्यालयांना पत्र पाठवून दि. १ एप्रिलपुर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना ही सक्ती करण्यात येऊ नये, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ही वाहने संबंधित उपकरणांशिवाय योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण तसेच नोंदणीसाठी पात्र ठरणार आहेत. दि. २ ते ५ एप्रिल या कालावधीत ज्या वाहनधारकांना योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी पूर्वनियोजित वेळ मिळाली होती. परंतु, त्यांची वाहन तपासणी झालेली नाही. अशा पुणे कार्यालयातील नोंदणीकृत वाहनधारकांना दि. ८ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता पुरंदर तालुक्यातील दिवे येथील ट्रॅकवर आणि पिंपरी चिंचवड कार्यालयातील नोंदणीकृत वाहनधारकांनी मोशी येथील ट्रॅकवर वाहने तपासणीसाठी हजर करावीत, असे आवाहन आरटीओ कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेRto officeआरटीओ ऑफीस