शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

वृद्धेचा खून करून पळालेला उच्चभ्रू गजाआड, आर्थिक वादातून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 23:06 IST

विश्रांतवाडी परिसरात दोन महिन्यापूर्वी ७० वर्षाच्या महिलेचा गळा चिरुन खून करुन घरातील दीड लाख रुपयांचे दागिने घेऊन पसार झालेल्याला गुन्हे शाखा व विश्रांतवाडी पोलिसांच्या पथकाने झारखंडमधील धनबाद येथून पकडले.

 पुणे : विश्रांतवाडी परिसरात दोन महिन्यापूर्वी ७० वर्षाच्या महिलेचा गळा चिरुन खून करुन घरातील दीड लाख रुपयांचे दागिने घेऊन पसार झालेल्याला गुन्हे शाखा व विश्रांतवाडी पोलिसांच्या पथकाने झारखंडमधील धनबाद येथून पकडले. मनिष योगेश चड्डा (वय ४८, रा़ खडकी) असे त्याचे नाव असून गेली दोन महिने तो पोलिसांना गुंगारा देत वेगवेगळ्या राज्यात फिरत होता.याबाबत पोलीस उपायुक्त पंकज डहाणे आणि दीपक साकोरे यांनी माहिती दिली़ विश्रांतवाडी येथील धानोरी रोडवर असलेल्या अंबानगरी सोसायटी राहणा-या राधा माधवन नायर (वय ७१) यांचा कटरच्या सहाय्याने गळा चिरुन खून करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी विश्रांतवाडी पोलिसांबरोबरच गुन्हे शाखा समांतर तपास करीत होती़ तपासादरम्यान नायर कुटुंबियांकडून मिळालेल्या माहितीवरुन हा खून मनिष चढ्ढा हा आपल्या दोन मुलांसह पसार झाल्याचे लक्षात आल्याने पोलिसांचा त्याच्यावर संशय होता़ खुन केल्यानंतर तो प्रथम गोव्यात गेला़ तेथून तो चेन्नईला गेला़ तेथून पुन्हा गोव्याला आला तेथून त्याने भाड्याने मोटार घेतली़ ही मोटार कर्नाटकात गहाण ठेवून तो विजयवाडा, पटणा, भुवनेश्वर, रांची, पुरी, जमशेटपूर येथे जाऊन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये रहात होता़ त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके वेगवेगळ्या राज्यात फिरत होती़ परंतु, तो त्यांना गुंगारा देत होता़ जमशेटपूर येथे तो आपल्या दोन मुलांसह असल्याची माहिती पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांना मिळाली़ त्यानंतर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम व विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विशाल मोहिते यांचे पथक रवाना झाले़ तोपर्यंत जमशेटपूरहून त्याने पोबारा केला होता़ वाहने भाड्याने घेऊन ती विकण्याची सवय लक्षात घेऊन पोलिसांनी चौकशी केल्यावर तेथील एका व्यावसायिकांनी तो धनबाद येथे येणार असल्याची माहिती दिली़ त्यानुसार पोलिसांनी धनबाद येथे त्याला पकडले़ न्यायालयाने त्याला १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली आहे़ 

उच्चभ्रू पण मती फिरलेली

मनिष चड्डा हा उच्च शिक्षित असून अस्खलितपणे इंग्रजीतून संभाषण करुन तो समोरच्याला भुरळ पाडतो़ हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स त्याने केला होता़ नामांकित हॉटेलमध्ये त्याने नोकरीही केली होती़ त्याने चार जणींशी संसार केला़ दुसºया पत्नीची १७ वर्षाची मुलगी आणि १५ वर्षाचा मुलगा त्याच्याबरोबर होते़ पुण्यात माझा काही प्रॉब्लेम सुरु असल्याची थाप त्याने या मुलांना मारली होती़ त्याच्या या कृत्यानंतर गेले दोन महिने ते बाहेर फिरत असल्याने बारावीत असलेल्या या मुलीचा परिक्षेचा फॉर्म भरता आलेला नाही़ गोड बोलून त्याने जवळच्या अनेक नातेवाईकांना फसविले आहे़ 

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणे