शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

जागो ग्राहक जागो...ओला, विमा आणि टुरिस्ट कंपन्यांना ग्राहक मंचाचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 13:30 IST

पुणे : १५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा होतो. ग्राहक संरक्षण कायदा १९८६ पासून अस्तित्वात आहे. ...

पुणे : १५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा होतो. ग्राहक संरक्षण कायदा १९८६ पासून अस्तित्वात आहे. केंद्र सरकारने जनजागृतीसाठी ‘जागो ग्राहक जागो’, ही संकल्पना घेऊन त्याच नावाने स्वतंत्र वेबसाईट निर्माण केली आहे. ग्राहकांना न्याय मिळतो, याची साक्ष देणारे पुण्यातील अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने अलिकडेच दिलेले हे तीन निकाल.

ओला कंपनीला दणका तक्रारदारांना मुलीला भेटण्यासाठी हाँगकाँगला जायचे होते. घरापासून विमानतळापर्यंत जाण्यासाठी त्यांनी ओला ॲपद्वारे कॅब बुक केली. दोघेही ज्येष्ठ नागरिक आहेत. पण कॅब आलीच नाही. शेवटी दुसरी कॅब करून त्यांना जावे लागले. तक्रारदार अंजली दातार यांनी पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार केली. ती अतिरिक्त जिल्हा आयोगाकडे वर्ग करण्यात आली. सेवा देण्यात टाळाटाळ केल्याने ज्येष्ठ नागरिकांना मानसिक त्रासापोटी १० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश आयोगाने दिला.

कृषी अपघात विमा प्रकरणी महिलेला न्यायआनंदा (आनंदराव) काशीनाथ सुतार हे शेतकरी होते. साताऱ्यावरून कऱ्हाडला मिनी बसने जात असताना ट्रकला मिनी बसची धडक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीने कृषी अधिकाऱ्याकडे विम्याचा दावा दाखल केला. मात्र, विमा कंपनीने नावातील बदल आणि ६ क चा वारसा नोंदीचा उतारा मुदतीत दाखल न केल्याने क्लेम नाकारला. पत्नीने तक्रार दाखल केली. शेतकरी अपघात नुकसान भरपाई म्हणून २ लाख रुपये नुकसान भरपाईची वार्षिक ७ टक्के व्याजदरासह द्यावी, असा आदेश ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला.

टुरिस्ट कंपनीला व्याजासह द्यायला लावली भरपाईसहलीसाठी पैसे भरूनदेखील दोनदा सहल रद्द झाल्याने मानसिक त्रास झालेल्या चिंचवड येथील ज्येष्ठ नागरिकाला न्याय मिळाला. सहलीसाठी भरलेले ६८ हजार रुपये २२ जून २०२० पासून १० टक्के व्याजाने परत द्यावे, असा आदेश ग्राहक तक्रार आयोगाने दिला. nतसेच नुकसान भरपाईपोटी २५ हजार, तक्रारीच्या खर्चापोटी ३ हजार रुपये द्यावे, असेही आदेशात म्हटले आहे. 

 

टॅग्स :OlaओलाPuneपुणे