शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
4
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
5
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
6
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
7
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
8
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
9
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
10
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
11
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
12
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
13
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
14
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
15
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
16
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा ६ विषयांत झाला फेल तरी पालकांनी कापला केक, कारण...
17
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
18
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
19
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
20
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."

ओबीसीहिताची बाजू न्यायालयात मांडणार

By admin | Updated: January 26, 2017 00:50 IST

सरकारने राज्य मागासवर्ग आयोगावर केलेल्या नियुक्त्या बेकायदेशीर असल्याने त्या तत्काळ रद्द करून नव्याने आयोगाची रचना करावी,

पुणे : सरकारने राज्य मागासवर्ग आयोगावर केलेल्या नियुक्त्या बेकायदेशीर असल्याने त्या तत्काळ रद्द करून नव्याने आयोगाची रचना करावी, अशी मागणी ओबीसी संघर्ष समितीतर्फे करण्यात आली. मराठा आरक्षणविषयक उच्च न्यायालयातील याचिकेवर ४३५ ओबीसी जातींतर्फे ओबीसीहिताची बाजू प्रखरपणे मांडली जाईल, असा निर्णय घेण्यात आला. याबाबतचे प्रतिज्ञापत्र या आठवड्यात सादर केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. पुण्यामध्ये ओबीसी संघर्ष समितीची परिषद नुकतीच झाली. विविध १८८ जाती संघटनांचे राज्यभरातील प्रतिनिधी उपस्थित होते. कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. बी. एल. सगरकिल्लारीकर अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके, चंद्रकांत बावकर, संजय सोनवणी, अ‍ॅड. महादेव आंधळे, नवीनचंद्र बांदिवडेकर, प्रकाश तोडणकर, संदेश मयेकर, कमलाकर दरवडे, दामोदर तांडेल, सीए जे. डी. तांडेल यांनी मार्गदर्शन केले. रामदास भुजबळ, मृणाल ढोले-पाटील, प्रा. शंकर महाजन, मंगेश ससाणे, चंद्रशेखर भुजबळ आदी वक्त्यांनी आपले विचार मांडले. ओबीसी जातींच्या विविध प्रतिनिधींनी मराठा मूक मोर्चांद्वारे निर्माण केल्या जात असलेल्या सामाजिक दहशतीबाबत चिंता व्यक्त करत त्यांच्या ओबीसीकरणाला स्पष्ट विरोध केला. राज्य मागासवर्ग आयोगावरील राज्य शासनाने केलेल्या नियुक्त्या आयोगाच्या कायद्याची पायमल्ली करणाऱ्या आहेत. मूक मोर्चांच्या समितीतील व्यक्तीला अध्यक्ष नेमणे, गणिताच्या प्राध्यापकाला समाजशास्त्रज्ञ म्हणून नेमणे, मराठा आरक्षणाच्या बाजूने मतदान केलेल्या सदस्याची फेरनियुक्ती करणे, एकाच जातीचे बहुमत होईल अशी व्यवस्था करणे हा ओबीसीद्रोही निर्णय आहे. या आयोगावर नेमलेल्या एकाही सदस्याचा ओबीसी प्रवर्गाचा काडीमात्र अभ्यास नाही. आयोगावर अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त, मुस्लीम ओबीसी, एसबीसी समाजाचा एकही प्रतिनिधी घेतलेला नाही. आयोगाचा अध्यक्ष ओबीसीच असायला हवा. या नवनिर्मित आयोगावरील एकही व्यक्ती या ओबीसींच्या भल्यासाठी काम करील, अशी शक्यता नाही. त्यामुळे या नियुक्त्या तत्काळ रद्द करून ओबीसी प्रवर्गातील अभ्यासू तज्ज्ञ व्यक्तीच या आयोगावर घ्याव्यात, अशा मागण्याही करण्यात आल्या. दखल घेतली नाही तर राज्यभरात तीव्र आंदोलनाद्वारे याचा निषेध केला जाईल, असा इशाराही दिला गेला.