पुणे : शहरामध्ये महापालिकेच्या केवळ १५ क्षेत्रीय कार्यालयनिहाय प्रत्येकी एका केंद्रांवर सध्या ३० ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लस दिली जात आहे़ मात्र लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रभागनिहाय केंद्रांवर या वयोगटातील लसीकरणाची व्यवस्था करण्यात यावी़, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे़
महापालिकेकडून ३० ते ४५ वयोगटातील नागरिकांना लस देण्यास सुरूवात करण्यात आली आहे़ पण या लसीकरण केंद्रांची संख्या ही प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय एकच आहे़ प्रत्येक लसीकरण केंद्रावर ३० ते ४० टक्के लस सध्या शिल्लक राहत आहेत. यामुळे शिल्लक राहिलेल्या लस या ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांना देण्याची व्यवस्था करावी व याकरिता लसीकरण केंद्राची संख्या वाढवून प्रत्येक प्रभागनिहाय एक लसीकरण केंद्र उपलब्ध करून द्यावे, असेही धुमाळ यांनी आपल्या पत्रात सांगितले आहे़
---------------------------