शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

बारामती तालुक्यात उमेदवारांची कोटींची उड्डाणे

By admin | Updated: February 18, 2017 02:29 IST

तालुक्यात यंदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत १६ जण क ोट्यधीश उमेदवार आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेसाठी

बारामती : तालुक्यात यंदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत १६ जण क ोट्यधीश उमेदवार आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेसाठी ९ जण, तर पंचायत समिती गणातील ७ जण कोट्यधीश आहेत.निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी ५ हजारांपासून, १ लाख तसेच पुढे १३ कोटी रुपयांहून अधिक मालमत्तेचे विवरण निवडणूकनिर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केले आहे. जिल्हा परिषदेमधून गुणवडी-शिर्सुफळगटातून निवडणूक लढवित असलेले रोहित पवार यांची सर्व उमेदवारांमध्ये सर्वाधिक १३ कोटी २४ लाख रुपये संपत्ती नोंद करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ करंजे पुल-निंबूत गटातील राष्ट्रवादीचे उमेदवार प्रमोद काकडे यांची ७ कोटी ७० लाख ४९ हजार रुपये संपत्ती आहे. तसेच  याच गटातील काँग्रेसचे उमेदवार तानाजी गायकवाड यांची १ कोटी ७९ लाख, सांगवी डोर्लेवाडी गटातील राष्ट्रवादीच्या उमेदवार मीनाक्षी  तावरे यांची ५ कोटी ७५ लाख, वडगाव निंबाळकर-मोरगाव गटातील राष्ट्रवादीचे उमेदवार विश्वास देवकाते यांची ३ कोटी ६९ लाख, माळेगाव बु. पणदरे गटातील राष्ट्रवादीच्या रोहिणी तावरे यांची १ कोटी ८९ लाख, सुपे-मेडद  गटातील राष्ट्रवादीचे भरत खैरे  यांची १ कोटी २८ लाख, तसेच याच गटातील बीजेपीचे उमेदवार दिलीप खैरे यांची ३ कोटी १३ लाख रुपये, तसेच बीजेपीच्या माळेगाव बु. पणदरे गटातील विजया तावरे यांची ३ कोटी ८१ लाख रुपये संपत्ती नोंद करण्यात आली आहे. तर गणामध्ये सुपे गणातील राष्ट्रवादीच्या उमेदवार नीता  बारवकर यांची ५ कोटी ७५ लाख रुपये संपत्ती नोंद करण्यत आली  आहे. मेडद गणातील याच पक्षाच्या शारदा खराडे यांची ४ कोटी ५ लाख, याच गणातील बीजेपीच्या सुवर्णा भापकर यांची २ कोटी १०लाख, तर शिर्सुफळ गणातून राष्ट्रवादीचे भरत गावडे यांची २ कोटी ७० लाख, मोरगाव गणातील याच पक्षाचे राहुल भापकर यांची १ कोटी १२ लाख, करंजे पूल गणातून मेनका मगर  यांची ४ कोटी ८९ लाख, डोर्लेवाडी गणातील राहुल झारगड यांची १ कोटी ८८ लाख संपत्ती नोंद करण्यात आली आहे. निवडणुकीत राष्ट्रवादी  काँगेसचे सर्वाधिक उमेदवार कोट्यधीश असल्याचे विवरण पत्रात नोंद केलेल्या संपत्तीवरून दिसून  येते. (प्रतिनिधी)