शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

तंत्रज्ञानाच्या चांगल्या परिणामांची संख्या जास्त : स्पृहा जोशी; करम तेज पुरस्कार प्रदान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 14:49 IST

करम संस्थेतर्फे स्पृहा जोशी यांना ‘करम तेज’ पुरस्कार ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण यांच्या हस्ते एस. एम. जोशी सभागृह येथे प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्देआपल्याकडे तंत्रज्ञानाला खूप लवकर नावे ठेवली जातात : स्पृहा जोशी यावेळी सादर करण्यात आला मराठी गझल मुशायरा कार्यक्रम

पुणे :  फेसबुक, आॅर्कुट, टिष्ट्वटर या  माध्यमासह प्रत्येक तंत्रज्ञानाला लोकांनी प्रथम नाकारले. या माध्यमांशी जुळवून घेण्यात लोकांना सुरुवातीला अडचणी आल्या. परंतु, नावे ठेवणारीच माणसेच तंत्रज्ञानाच्या वापरात आज आघाडीवर आहे. तंत्रज्ञानामुळे चांगले, वाईट परिणाम होत असतात. त्यात तंत्रज्ञानाच्या चांगल्या परिणामांची संख्या निश्चितच जास्त आहे. पण, आपल्याकडे तंत्रज्ञानाला खूप लवकर नावे ठेवली जातात, असे मत अभिनेत्री व कवयित्री स्पृहा जोशी यांनी व्यक्त केले. करम संस्थेतर्फे स्पृहा जोशी यांना ‘करम तेज’ पुरस्कार ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण यांच्या हस्ते एस. एम. जोशी सभागृह येथे प्रदान करण्यात आला. या वेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात गझलकार सुप्रिया जाधव आणि कवी शांताराम खामगावकर यांच्या अनुक्रमे कोषांतर व भवताल या गझलसंग्रह व काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. कैलास गायकवाड, भूषण कटककर, अ‍ॅड. प्रमोद आडकर आदी मान्यवर उपस्थित होते. जोशी म्हणाल्या, की तंत्रज्ञानामुळे माणसे जवळ आली. त्यांच्यातला संवाद वाढला. एकमेकांच्या चुका, कमतरतांसह सुख-दु:खदेखील समजण्यास  खूप मदत झाली. याचा उत्तम अनुभव कवितेच्या क्षेत्रातून गझलेच्या प्रांतात प्रवेश केल्यावर जवळून आला. मनात दडलेला विचांराचा ऐवज असह्य झाल्यावर कवितांचा जन्म होतो. कवितांच्या व्यक्त होण्याला मर्यादा नाही. अभिनय व कविता या दोन्ही क्षेत्रात वावरताना माझ्यातील प्रचंड ऊर्जेला व्यक्त करण्यासाठी कविता हे अप्रतिम समांतर माध्यम आहे. मिळणारे पुरस्कार हुरुप व प्रेरणेसोबत वाढलेल्या जबाबदारीची जाणीवही करून देतात.मराठी गझल मुशायरा कार्यक्रम सादर करण्यात आला. यात वैभव कुलकर्णी, भूषण कटककर, प्रमोद खराडे, सुप्रिया जाधव, शांताराम खामगावकर, अमोल शिरसाठ, डॉ. कैलास गायकवाड, विजय वडेराव सुनीती लिमये आदींनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमात प्रथमच स्पृहा जोशी यांनी गझल सादर केली. त्याला उपस्थितांनी मुकर्रम, आदाब, अर्ज है अशी उत्स्फूर्त दाद दिली. 

चिन्मयी चिटणीस यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. 

टॅग्स :Spruha Joshiस्पृहा जोशीtechnologyतंत्रज्ञानPuneपुणे