शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Pune Corona News: शहरात कोरोनाबाधितांच्या वाढीचा आकडा थांबेना; शुक्रवारी तब्बल ४१२ नवे रूग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 18:41 IST

राज्य शासनाच्या निर्देषानुसार ज्या शहरात बाधितांची टक्केवारी (शंभर तपासणीमागे बाधितांची संख्या) ५ टक्क्यांच्यावर जाते, त्या शहरात निर्बंध अधिक कडक करण्याचा अधिकार हा स्थानिक प्रशासनाला आहे

पुणे : शहरात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस शंभरच्या घरातच वाढत असून, शुक्रवारी (दि़३१) तब्बल ४१२ नवे रूग्ण आढळून आले असून, तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी ६ टक्क्यापर्यंत गेली आहे. राज्य शासनाच्या निर्देषानुसार ज्या शहरात बाधितांची टक्केवारी (शंभर तपासणीमागे बाधितांची संख्या) ५ टक्क्यांच्यावर जाते, त्या शहरात निर्बंध अधिक कडक करण्याचा अधिकार हा स्थानिक प्रशासनाला आहे. 

पुण्यात गेल्या दहा दिवसांपासून ही टक्केवारी अडीच टक्क्यांवरून चार, साडेचार व पाच तर आता सहा टक्क्यांवर गेली आहे. सन २०२१ च्या सरत्या वर्षात अखेरच्या पंधरा दिवसात कोरोना संसर्गाने पुन्हा डोके वर काढले असून, नवीन वर्षात निर्बंध टाळण्यासाठी योग्य खबरदारी व गर्दी टाळणे, मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टसिंग आदी उपाययोजना अनिवार्य बनल्या आहेत. 

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दिवसभरात ६ हजार ९४४ जणांनी कोरोना चाचणी करून घेतली असून, यापैकी ५.९३  टक्के रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. दिवसभरात ९५ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून, शहरातील रूग्ण संख्या १ हजार ७९९ इतकी झाली आहे.      शहरात २५ डिसेंबरनंतर गेल्या सहा दिवसात ८२७ नव्या सक्रिय रूग्णांची वाढ झाली आहे. दोन जणांचा मृत्यू झाला असून हे दोघेही पुण्याबाहेरील आहेत.  सध्या विविध रुग्णालयात ९२ गंभीर रुग्णांवर तर, ५६ रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. शहरात आतापर्यंत ३८ लाख ६५ हजार ११३ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यातील ५ लाख १० हजार २१८ जण कोरोनाबाधित आढळून आले. त्यापैकी ४ लाख ९९ हजार ३०३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत शहरात ९ हजार ११६ जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdocterडॉक्टरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाHealthआरोग्य