शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षाच्या परिश्रमानंतर तयार केली 'न्युक्लियर बॅटरी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 20:04 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी तब्बल चार वर्षाच्या परिश्रमानंतर ‘न्युक्लियर बॅटरी’ तयार केली आहे.

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी तब्बल चार वर्षाच्या परिश्रमानंतर ‘न्युक्लियर बॅटरी’ तयार केली आहे. पेस मेकर,सेंसर,पाणबुडी किंवा सुक्ष्म इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये या बॅटरीचा उपयोग करता येऊ शकतो. त्याचप्रमाणे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायजेशनच्या (इस्त्रो)विविध अवकाश मोहिमांसाठी सुध्दा ही बॅटरी उपयोगात आणता येणार आहे.इस्त्रोकडून देण्यात आलेल्या प्रकल्पांतर्गत विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ.संजय ढोले ,डॉ.वसंत भोरसकर व संशोधक विद्यार्थी आंबादास पटागरे यांनी ही बॅटरी तयार केली आहे. इस्त्रोकडून न्युक्लियर बॅटरी तयार करण्यासाठी आर्थिक सहकार्य मिळाले आहे. बॅटरी तयार करण्यासाठी प्रामुख्याने टिटॅनियम आॅक्साईड व सिलिकॉन कार्बाईड या सुक्ष्म पदार्थांचा वापर करण्यात आला आहे. बॅटरीमध्ये न्युक्लिअर रेडिएशनच्या बिटा कणांचा किरनोत्सारी ट्रिशिअम स्त्रोत वापरण्यात आला आहे. या बिटा कणांची उर्जा 18 किलो इलेक्ट्रॉन होल्ट एवढी असून त्याची शक्ती 10 क्युरी आहे.क्युरी हे किरणोत्सारी मोजण्याचे एकक आहे. या बॅटरीमध्ये ट्रिशियम बिटा सोर्स आर्धायन (हाफ लाईफ)बारावर्षे असल्यामुळे बॅटरीचे आयुष्य 30 ते 35 वर्ष झाले आहे.डॉ.संजय ढोले म्हणाले, इस्त्रोने विद्यापीठाकडे न्यूक्लिअर बॅटरी तयार करण्याचे काम सोपविले होते. गेल्या चार वर्षांपासून त्यावर अभ्यास सुरू होता. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर, विभाग प्रमुख डॉ.सुरेश गोसावी यांच्या पाठिंब्यामुळे प्राध्यापकांना व विद्यार्थ्यांना न्यूक्लिअर बॅटरी तयार करण्यात यश आले. विद्यापीठाने इस्त्रोसाठी ही बॅटरी तयार केली आहे. पेस मेकर, सेंसर, पाणबुडी यांच्यासह ज्या ठिकाणी सुर्यप्रकाश पोहचू शकत नाही,अशा विविध प्रकारच्या सुक्ष्म इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये या बॅटरीचा उपयोग करता येऊ शकतो.बॅटरीची कार्यक्षमता ही बिटास्त्रोतांच्या क्षमतेच्या व्यस्थ प्रमाणात असल्याने शक्तीशाली न्युक्लिअर बॅटरी तयार करण्यास मर्यादा आहेत. परंतु, कमी शक्तीशाली बॅटरी तयार करणे या तंत्रामुळे शक्य झाले आहे,असे नमूद करून ढोले म्हणाले,बॅटरी तयार करण्याच्या संशोधनासाठी डॉ.शैलेंद्र दहिवले,डॉ.भूषण पाटील,डॉ.प्रमोद काळे यांचे सहकार्य लाभले.

टॅग्स :Educationशिक्षणPune universityपुणे विद्यापीठscienceविज्ञान