पुणे: राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे 2018-19 या शैक्षणिक वषार्तील राष्ट्रीय सेवा योजनेच्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून यंदाचा राज्य स्तरावरील सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार शिक्षण प्रसारक मंडळीच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयास मिळाला आहे. तर सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार स.प.महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी डॉ.विलास उगले यांना जाहीर झाला आहे.राज्य शासनातर्फे 1993-94 वषार्पासून राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत पुरस्कार दिले जातात. शासनाने 2018-19 या शैक्षणिक वषार्तील पुरस्कारासाठी विद्यापीठाकडून प्रस्ताव मागविले होते.उच्च व तंत्र शिक्षण विभागाने प्राप्त झालेल्या प्रस्तावामधून निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार अध्यादेशाद्वारे जाहीर केले आहेत.त्यात सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा पुरस्कार डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला मिळला असून याच विद्यापीठाचे कार्यक्रम अधिकारी डॉ.त्र्यंबक पाटील यांना सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिका-याचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.स्मृतिचिन्ह व दहा हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पदाचा पुरस्कार स.प.महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी डॉ.विलास उगले यांच्यासह धुळ्याच्या डॉ.दत्ता ढाले यांना मुंबईच्या रवी चेट्टीयार यांना तर गडचिरोलीच्या प्रदिप चापले यांना जाहीर झाला आहे.
स.प.महाविद्यालयाला एनएसएसचा राज्यस्तरीय पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 19:54 IST
राज्य शासनातर्फे 1993-94 वषार्पासून राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत पुरस्कार दिले जातात.
स.प.महाविद्यालयाला एनएसएसचा राज्यस्तरीय पुरस्कार
ठळक मुद्दे विलास उगले यांना सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकाऱ्याचा पुरस्कार