पुणे - शहरात डेंग्यूच्या साथीने थैमान घातल्याने महापालिकेने हाती घेतलेल्या डेंग्यू हटाव मोहिमेने चांगलाच वेग पकडला आहे. गेल्या आठ दिवसांत शहरात या मोहिमेसाठी तब्बल ५५० कर्मचारी कार्यरत असून, डासांची पैदास आढळलेल्या ठिकाणांसाठी आजअखेरपर्यंत १ हजार जणांना नोटीस बजाविण्यात आली असून, तब्बल १ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्या तीन महिन्यांत शहरात डेंग्यूच्या संशयित रूग्णांची संख्या अडीच हजारांच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनावर चौफेर टीका होत आहे. याचे पडसाद नुकत्याच झालेल्या मुख्य सभेतही उमटले होते. त्याची दखल घेत नवनियुक्त महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी प्रशासनाची बैठक घेऊन १५ दिवसांची डेंग्यू निर्मूलन मोहीम सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याअंतर्गत प्रशासनाकडून या मोहिमेसाठी आरोग्य विभागास १५ क्षेत्रीय कार्यालयांंतर्गत तब्बल ५५० कर्मचारी या मोहिमेसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यांच्यामार्फत जनजागृती, डासांची पैदासस्थळे शोधणे, औषधफवारणी, दंडात्मक कारवाई ही कामे केली जात आहेत.
डेंग्यू हटाव मोहिमेत २ हजार जणांना नोटिसा, तर १ लाखाचा दंड वसूल
By admin | Updated: September 23, 2014 06:48 IST