पुणे: शहरातील किराणा दुकाने, मेडिकल, पानटप-या व अन्य ठिकाणी अनधिकृतपणे फुकट जाहीरात करणा-या विविध प्रकारच्या तब्बल १८२ वेगवेगळ््या ब्रॅन्डला महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाच्या वतीने नोटीसा देण्यात आल्या आहेत. आपल्या उत्पन्नाची फुकट जाहीरात करणा-या या कंपन्यांकडून महापालिकेला तब्बल ३५ ते ४० कोटी रुपयांचा महसूल मिळू शकतो. विविध मसाले, घरगुती वापराच्या वस्तू, दूध, खाद्य पदार्थ, मोबाईल, व अन्य विविध ब्रॅन्ड शहरातील वेगवेगळी दुकांने, पानटप-या, किराणा दुकान, स्टॉल अशा विविध ठिकाणी संबंधित मालमत्ता धारकांची परवानगी घेऊन फुकट जाहिरात करतात. शहरामध्ये सध्या सर्वत्र अशा प्रकारच्या जाहीराती सरार्स केल्या जात आहेत. शहराच्या हद्दीत कोठेही व कशाही प्रकारची जाहिरात करण्यासाठी महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची परवानगी घेणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. परंतु शहरामध्ये सध्या विविध लहान-मोठ्या ब्रॅन्डकडून अशा जाहिराती करताना कोणत्याही प्रकारची महापालिकेची परवानगी घेतली नसल्याचे समोर आले आहे. शहरात फुकट व अनधिकृतपणे जाहिरात करणा-या सर्व ब्रॅन्डला महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाच्या वतीने नोटीसा देण्यात आल्या आहेत. यामध्ये महापालिकेच्या कायद्याचे व महापालिका जाहिरात धोरणाचे उल्लंघन केल्याने संबंधित कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहेत. तसेच नोटीस मिळाल्यापासून पंधरा दिवसांच्या आता नियमानुसार २२२ रुपये प्रती स्क्युअर फुट दराने जाहिरात शुल्क भरण्याची देखील तब्बी देण्यात आली आहे. दरम्यान जाहिरात शुल्क त्वरीत न भरल्यास व महापालिकेची परवानगी न घेतल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.-------------------महापालिकेला ३५ ते ४० कोटींचा महसूल मिळेलशहरामध्ये सर्रास सर्व ठिकाणी विविध कंपन्यांकडून आपल्या ब्रॅन्डची फुकट जाहीरात केली जाते. यासाठी कायद्यानुसार महापालिकेची परवानगी घेऊन नियमानुसार जाहीरात शुल्क भरणे बंधनकारक आहे. परंतु सध्या शहरात अशा प्रकारे जाहीरात करणा-या १८२ ब्रॅन्डला नोटीसा देण्यात आल्या असून, यामधून महापालिकेला तब्बल ३५ ते ४० कोटी रुपयांचा महसूल मिळू शकतो.- तुषार दौंडकर, आकाशचिन्ह विभाग प्रमुख----------------------मोबाईल कंपन्यांकडे १० कोटींची थकबाकीशहरा विविध मोबाईल दुकानांच्या बाहेर, मॉलमध्ये फुकट व अनधिकृतपणे जाहीरात करणा-या ओपो, सॅमसँग, रिलायन्स जीओ या मोबाईल कंपन्यांना महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाच्या वतीने नोटीसा देण्यात आल्या आहेत. या कंपन्यांकडे जाहीरात शुल्का पोटी तब्बल १० कोटी रुपयांची थकबाकी असून, ही वसूल करण्यासाठी लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आकाशचिन्ह विभागाचे प्रमुख तुषार दौंडकर यांनी सांगितले.
अनधिकृतपणे जाहिरात करणा-या विविध १८२ ब्रॅन्डला नोटीसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 20:51 IST
शहरात फुकट व अनधिकृतपणे जाहिरात करणा-या सर्व ब्रॅन्डला महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाच्या वतीने नोटीसा देण्यात आल्या आहेत.
अनधिकृतपणे जाहिरात करणा-या विविध १८२ ब्रॅन्डला नोटीसा
ठळक मुद्देमहापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची कारवाई : ३५ कोटींचा महसूल अपेक्षितजाहिरात शुल्क त्वरीत न भरल्यास व महापालिकेची परवानगी न घेतल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा मोबाईल कंपन्यांकडे १० कोटींची थकबाकी