शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

नोटाला हवा कायदेशीर आधार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 21:15 IST

सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीपासून केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकशाही अधिक भक्कम करण्यासाठी प्रथमच ‘नोटा’ (वरीलपैकी कोणीच नको) हे बटन देऊन उमेदवार नाकारण्याची सोय मतदान यंत्रामध्ये दिली आहे.

पुणे: सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीपासून केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकशाही अधिक भक्कम करण्यासाठी प्रथमच ‘नोटा’ (वरीलपैकी कोणीच नको) हे बटन देऊन उमेदवार नाकारण्याची सोय मतदान यंत्रामध्ये दिली आहे. परंतु सध्या ‘नोटा’ कोणताही कायदेशीर आधार नसून, निवडणुकीवर काही परिणाम होत नाही. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे या प्रमुख उद्देशानेच आयोगाने मतदारांच्या समाधानासाठी याचा उपयोग केला जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सन २०१३ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडमुकीत मतदारांना ‘नोटा’ चा पयार्याचा अधिकार दिला. त्यानंतर सन २०१४ मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या वेळी पहिल्यादा नोटा पयार्याचा वापर करण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली होती. आता लोकसभा, विधानसभा निवडणुकीबरोबरच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ‘नोटा’ वापरण्यास सुरुवात झाली आहे.  परंतु निवडणुकीत देण्यात आलेल्या ‘नोटा’ अद्याप कायदेशीर मान्यता मान्यात मात्र मिळालेली नाही. कारण एखाद्या मतदार संघामध्ये ‘नोटा’ ला बहुमत मिळून देखील निवडणूक ती निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची कोणतीही तरतुद सध्या आपल्या देशात नाही. त्यामुळे सध्या तरी ‘नोटा’ हा पर्याय निरुपयोगी असून, निवडणुकीवर थेट कोणताही परिणाम होत नाही. नोटामुळे  केवळ आता मतदारांना अभिव्यक्ती होते, पण बदल घडवता येत नसल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. 

कायदेशीर आधार मिळण्याची गरज

देशात आता लोकसभा-विधासभा निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढविणारा एकही उमेदवार पसंत नसले,मत द्यावा असा वाटत नसेल तर निवडणूक आयोगाने मतदान यंत्रामध्ये ‘नोटा’ चा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. परंतु सध्या तरी ‘नोटा’ कोणताही कायदेशीर आधार नाही. यामुळे एखाद्या मतदार संघामध्ये बहुसंख्ये मतदारांनी नोटाचा वापर केला तरी ती संबंधित निवडणूक रद्द करण्याची कोणतीही तरतुद कायद्यात नाही. तसेच नोटाचा वापर करणा-यांची संख्या देखील फारशी नाही. यामुळे लोकसभा-विधानसभा निवडणुकीमध्ये नोटाचा निवडणुकीवर कोणताही थेट परिणाम होत नाही. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडणुकीच्या निकालावर नोटाचा परिणाम होऊ शकतो.

- डॉ.नीला सत्यनारायण, निवृत्त राज्य निवडणूक आयुक्त

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूकVotingमतदान