शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

नॅचरोपॅथी अभ्यासक्रम नव्हे, मसाज केंद्र!

By admin | Updated: November 4, 2015 04:10 IST

पुण्यातील ‘नॅशनल इन्स्टिट्यूूट आॅफ नॅचरोपथी’ या संस्थेतर्फे चालविल्या जाणाऱ्या नॅचरोपॅथीच्या अभ्यासक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचे शोषण होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

पुणे : पुण्यातील ‘नॅशनल इन्स्टिट्यूूट आॅफ नॅचरोपथी’ या संस्थेतर्फे चालविल्या जाणाऱ्या नॅचरोपॅथीच्या अभ्यासक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचे शोषण होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. अभ्यासक्रमांतर्गत ‘मसाज’ हा विषय असून, संस्थेत उपचारांसाठी येणाऱ्या नागरिकांना मसाज करण्याचे काम विद्यार्थ्यांना करायला लावले जात आहे. यामध्ये रोज २०० रुग्णांचा मसाज करायला लावला जातो.दोन वर्षांचा डिप्लोमा कोर्स असून, पहिल्या वर्षासाठी ५, तर दुसऱ्या वर्षासाठी ६ विषय अभ्यासण्यासाठी आहेत. त्यातील जवळपास प्रत्येक विषयाला प्रात्यक्षिक असून, केवळ ‘मसाज’ या एकाच विषयाचे प्रात्यक्षिक दररोज ६ तास जबरदस्तीने करून घेतले जात आहे. याबरोबरच येथील प्राध्यापक विद्यार्थ्यांशी अतिशय वाईट पद्धतीने वागतात; तसेच विद्यार्थिनींना महाविद्यालयाची साफसफाईही करायला लावली जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. ‘नर्सिंग डिप्लोमा इन नॅचरोपथी अँड योग थेरपी’ या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अभ्यासक्रमाचा भाग आहे, असे सांगून हे शिफ्टमध्ये हे काम करून घेतले जाते. दुसऱ्या वर्षाचे महाविद्यालय जूनमध्ये सुरू होणे अपेक्षित असताना, मसाजच्या कामासाठी प्रात्यक्षिकाच्या नावाखाली विद्यार्थ्यांना मार्च महिन्यापासूनच बोलवून घेतले. अशाप्रकारे विद्यार्थ्यांचा वापर करून संस्था अर्थार्जन करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. यंदा दुसऱ्या वर्षासाठी ३० विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यातील १२ विद्यार्थिनी आहेत. यासंबंधी संस्थेच्या संचालिका डॉ. के. सत्यलक्ष्मी यांना संपर्क केला असता, त्या बाहेरगावी असल्याने संपर्क होऊ शकला नाही. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे संस्थेतील विद्यार्थ्यांच्या शोषणाविरुद्ध आंदोलन करण्यात आले. याशिवाय या अभ्यासक्रमाला सरकारी मान्यतादेखील नाही. भारताच्या कानाकोपऱ्यातून उत्तम शिक्षणाची अपेक्षा घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांचे शोषण या संस्थेतर्फे चालू आहे, ते त्वरित थांबवावे, अशी मागणी अभाविपने केली. याप्रसंगी संचालकांना निवेदन देण्यात आले. योग्य ती कार्यवाही न झाल्यास, तीव्र आंदोलनाचा इशाराही अभाविपने दिला.विद्यार्थ्यांनी केलेला आरोप खोटा असून, मसाजचे काम हे अभ्यासक्रमातील भाग आहे. अशाप्रकारे ६ तास मसाजचे काम करून घेतले जात नाही, तर अभ्यासक्रमानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला एक तास मसाजचे प्रात्यक्षिक करावे लागते. - के. सुभाष, व्यवस्थापकीय अधिकारीदुसऱ्या वर्षाला एकूण ६ विषय असून, त्यातील एकाच विषयाचे प्रात्यक्षिक सातत्याने घेण्यामागे संस्थेचा नक्कीच स्वार्थ आहे आणि आमची पिळवणूक केली जात आहे. या कामासाठी आम्हाला काही कारणाने सुटी हवी असल्यास, ती मिळत नाही. सुटी घेतल्यास विद्यावेतनातील पैसे कापतात. - द्वितीय वर्ष विद्यार्थी