शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

हा माझा नव्हे, तर भारताचा सन्मान - माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 03:04 IST

मेक्सिको सरकारकडून ‘ऑर्डन मेक्सिकाना डी अ‍ॅग्यूइला झटेका’ सन्मान

पुणे : मेक्सिको सरकारने केलेल्या सन्मानामुळे मी भारावून गेले आहे. हा दोन्ही देशांमधील मैत्रीचा सन्मान आहे. हा केवळ माझा नव्हे, तर भारताचा सन्मान असल्याची कृतार्थ भावना माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केली.

मेक्सिको सरकारचा प्रतिष्ठेचा ‘ऑर्डन मेक्सिकाना डी अ‍ॅग्यूइला झटेका’ हा राष्ट्रीय पुरस्कार मेक्सिकोच्या भारतातील राजदूत सेन्यूया मेलबा प्रिया यांच्या हस्ते प्रतिभाताई पाटील यांनी स्वीकारला. मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजच्या सभागृहात शनिवारी हा कार्यक्रम झाला. ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. एस. के संचेती, सिंबायोसिस’चे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी आदी मान्यवर सोहळ्याला उपस्थित होते.मेक्सिकोशी मानवतावादी परस्पर संबंध दृढ करणाऱ्या परदेशी नागरिकाचा मेक्सिको सरकारतर्फे सन्मान करण्यात येतो. अनेक वर्षांनी या पुरस्कारासाठी एका भारतीय व्यक्तीची निवड करण्यात आली. सेन्यूया मेलबा प्रिया म्हणाल्या, प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असताना दोन्ही देशांदरम्यान असलेले संबंध अधिक दृढ झाले. त्यांचे हे योगदान आम्ही विसरलेलो नाही.

सत्काराला उत्तर देताना प्रतिभाताई यांनी या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मेक्सिको सरकारचे आभार मानले. हा दोन्ही देशांमधील मैत्रीचा सन्मान आहे. या पुरस्काराने खूप भारावून गेले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांनी मेक्सिकोमधील आठवणींना उजाळा दिला. २००७ मध्ये मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताला भेट दिली होती. त्यानंतर राजकीय, आर्थिक संबंध अधिक दृढ कसे करता येतील या दृष्टिकोनातून उद्योग क्षेत्रातील काही प्रतिनिधींचे शिष्टमंडळ मेक्सिकोला पाठविले होते. आपण एकत्रितपणे कोणते उपक्रम करू शकतो, याची त्यांच्याकडून माहिती घेतली. २००८ मध्ये मेक्सिकोच्या भेटीनंतर दोन्ही देशांमध्ये काही विषयांसंबंधी करार करण्यात यशस्वी ठरले, याचा आनंद असल्याचे पाटील यांनी सांगितले.स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान दिलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मेक्सिकोच्या राजदूतपदी विजयालक्ष्मी पंडित यांची निवड केली आणि तेव्हापासून या दोन्ही देशांमध्ये ऋणानुबंध जुळले असल्याचा आवर्जून उल्लेख प्रतिभाताई पाटील यांनी केला.

टॅग्स :Pratibha Devisingh Patilप्रतिभा देवीसिंग पाटीलPresidentराष्ट्राध्यक्ष