शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

महिलांचा अपमान होईल असे वक्तव्य केले नाही! निवृत्ती महाराज यांचे तृप्ती देसाई यांच्या नोटिशीला उत्तर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 23:00 IST

आजपर्यंत कधीही किर्तनातून महिला अपमानीत होतील किंवा त्यांचा अनादर होईल, अंधश्रद्धा पसरेल, असे वक्तव्य केलेले नाही

पुणे - माझे कोणी समर्थक नाही़ अज्ञात लोकांनी तृप्ती देसाई यांना धमकी दिली असेल तर त्याला आपण जबाबदार नाही़ आजपर्यंत कधीही किर्तनातून महिला अपमानीत होतील किंवा त्यांचा अनादर होईल, अंधश्रद्धा पसरेल, असे वक्तव्य केलेले नाही, असे निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी स्पष्ट केले आहे़ निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी जाहीर कीर्तनातून अंधश्रद्धा पसरविणारे वादग्रस्त वकतव्य केले होते. महिलांविषयी निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर  नेहमीच आक्षेपार्ह  टिप्पणी व वकतव्ये करीत असतात व महिलांचा जाहीररित्या अपमान  करीत असतात या मुद्द्यावरून सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी अ‍ॅड़  मिलिंद दत्तात्रय पवार यांचे मार्फत कायदेशीर नोटीस पाठविली होती़ या नोटिशीला निवृत्ती महाराज देशमुख यांनी अ‍ॅड़ डॉ़ मिलिंद साळुंखे यांच्या मार्फत या उत्तर दिले आहे. या उत्तरात देसाई यांनी केलेले आरोप इंदोरीकर महाराज यांनी फेटाळून लावले आहेत.  निवृत्ती महाराज देशमुख  यांचे कोणी समर्थक नाही. निवृत्त महाराज कुठल्याही समर्थकांना ओळखत  नाही, काही अज्ञात लोकांनी काही उद्योग केले असतील तर  त्याला निवृत्ती महाराज जबाबदार नाही. निवृत्ती महाराज देशमुख यांनी आजपर्यंत कधीच  कीर्तनातून महिलांना अपमानीत होईल किंवा  महिलांचा अनादर होईल असे वकव्य किंवा अंधश्रद्धा पसरेल असे वकव्य  जाहीर  कीर्तनातून कधीही केलेले नाही. त्यामुळे महाराजांनी  महिलांची जाहीर  माफी  मागावी असे निवृत्ती महाराज देशमुख यांना वाटत नाही किंवा माफी  मागण्याचा प्रश्नच येत नाही अशा आशयाचा मजकूर असलेले  उत्तर  अ‍ॅड  मिलिंद दत्तात्रय पवार  यांना निवृत्ती महाराज  देशमुख यांनी त्यांच्या सहीनीशी  रजिस्टर  पत्राद्वारे  पाठविले  आहे. देसाई यांनी इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना फोन करुन जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या़ या विरोधात त्यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात निवृत्त महाराज देशमुख व धमकी देणाºयाविरोधात तक्रार दिली आहे़ मात्र, लॉकडाऊनमुळे ही तक्रार प्रलंबित आहे. 

टॅग्स :indurikar maharajइंदुरीकर महाराजCourtन्यायालयWomenमहिला