शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
3
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
5
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
6
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
7
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
8
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
9
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
10
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
11
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
12
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
13
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
14
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
15
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
16
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
17
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

चतुश्रृंगीला रोप वे नव्हे तर सरकता जिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 21:02 IST

चतुश्रृंगी देवी येथे जमीन भुसभुशीत असून रोप वे न करता मंदिरापर्यत सरकता जिना तयार करण्यात येणार आहे...

ठळक मुद्देतीन साथीदार मात्र फरार   सर्व भाविकांचा यात्रेसह संपूर्ण वर्षाचा व मंदिराच्या परिसराचा देखील विमाकुठलाही अनुचित प्रकार उत्सवादरम्यान घडू नये यासाठी 20 सीसीटीव्ही कँमेरे

पुणे :  श्री चतुश्रृंगी देवी ट्रस्टच्यावतीने देवीकरिता दीड किलो वजनाचा नवीन सोन्याचा मुकूट तयार करण्यात आला आहे. तसेच ज्याठिकाणी रोप वे निर्मिती करायची आहे. त्याजागी टेकडीची उंची 100 मीटरपेक्षा कमी असल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. तेथील जमीन भुसभुशीत असून रोप वे न करता मंदिरापर्यत सरकता जिना तयार करण्यात येणार आहे. अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुहास अनगळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. 10 आॅक्टोबर रोजी नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार असून तो उत्सव 18 आॅक्टोबरपर्यत चालणार आहे. घटस्थापना बुधवारी (10) सकाळी आठ वाजता होणार आहे. यावेळी सकाळी सहा ते 9 वेळेत   अभिषेक,रुद्राभिषेक,महापुजा,महावस्त्र अर्पण केले जाणार आहे. पौरोहित्याची जबाबदारी नारायण कानडे गुरुजी पार पाडणार आहेत. नवरात्रोत्सवाकरिता चतुश्रृंगी ट्रस्टच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली असून त्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. याविषयी माहिती देताना अनगळ म्हणाले, मंदिराच्या जिर्णोधाराचे काम सुरु करण्यात येणार आहे. यंदाच्या उत्सवात स्तनपान कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. केरळमधील पुरग्रस्तांकरिता ट्रस्टच्यावतीने एक लाख रुपयांची देणगी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात येणार आहे. सध्या मंदिराच्या परिसरातील रंग रंगोटीची कामे अंतिम टप्यात आली असून सर्व भाविकांचा यात्रेसह संपूर्ण वर्षाचा व मंदिराच्या परिसराचा देखील विमा काढण्यात आला आहे. उत्सवकाळात स्वच्छतेकरिता व आरोग्याची सुरक्षा यासाठी महापालिकेच्यावतीने कीटकनाशकांची फवारणी, कचरा उचलण्याकरिता जादा कंटेनरची व्यवस्था करण्यात आली आहे. कुठलाही अनुचित प्रकार उत्सवादरम्यान घडू नये यासाठी 20 सीसीटीव्ही कँमेरे लावण्यात आले आहेत. व्यवस्थापक सहाय्यसाठी अनिरुध्द सेवा केंद्राचे 150 स्वयंसेवक, भाविकांना दर्शन घेवून लवकर बाहेर पडता यावे याकरिता बँरिकेटची व्यवस्था आणि पोलीस,होमगार्ड, खासगी सुरक्षा रक्षक, मंदिरात बंदुकधारी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आल्याचे कार्यकारी विश्वस्त दिलीप अनगळ यांनी सांगितले. याशिवाय पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या मैदानावर विनामुल्य पार्किंग, भाविकांसाठी रुग्णवाहिका, यात्रेत रांगेत उभे राहणा-या भक्तांकरिता पिण्याचे पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

टॅग्स :Puneपुणेchatushrungi templeचतु:श्रृंगी मंदीर