शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेच्या 'टेली मेडिसिन' सुविधेला मिळेना प्रतिसाद; कॉल सेंटर्सचे फोन क्रमांक पोहचविण्यात अपयश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 11:47 IST

खासगी रुग्णालयांच्या धर्तीवर सुरु केली होती सुविधा

ठळक मुद्देखासगी रुग्णालयांमार्फत मार्गदर्शन सल्ल्यांसाठी दीड ते दोन हजार दर

पुणे : गृह विलगीकरणात राहून घेणा-या रुग्णांना फोनवरून वैद्यकीय सल्ला देण्यासाठी महापालिकेने सुरु केलेल्या  ‘टेली मेडिसिन’ सुविधेला नागरिकांकडून अजिबातच प्रतिसाद मिळालेला नाही. यामध्ये नागरिकांचा दोष नाही तर पालिकाच नागरिकांपर्यंत या टेली मेडिसिन कॉल सेंटरचे क्रमांक पोहचविण्यात कमी पडल्याचे चित्र आहे. 

खासगी रुग्णालयांकडून रुग्णांना दूरध्वनीवरुन वैद्यकीय सल्ला देण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच व्हिडीओ कॉलद्वारे उपचारांबाबत मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी दीड हजारांपासून ते पाच हजारांपर्यंतचे दर आकारले जातात. गृह विलगिकरणात असलेल्या रुग्णांना वैद्यकीय सल्ला, त्यांची तपासणी आणि विचारपूस, औषधांची माहिती व समुपदेशन देण्याची आॅनलाईन सुविधा विविध खासगी रुग्णालयांनी सुरू केली आहे. महापालिकेने त्याच धर्तीवर नागरिकांसाठी मोफत  ‘टेली मेडिसिन’ची सुविधा सुरू केली असून कमला नेहरू रुग्णालयात स्वतंत्र कक्ष त्याकरिता निर्माण करण्यात आला आहे. याठिकाणाहून २४ बाय ७ कोरोनासंदर्भात वैद्यकीय सल्ला आणि मदत देण्याचे काम सुरू करण्यात आले होते. शहारातील कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामध्ये लक्षणे नसलेल्या रूग्णांची संख्याही मोठी आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निदेर्शानुसार ज्या रुग्णांना घरामध्ये राहून उपचार घेणे शक्य आहे अशा रुग्णांना गृह विलगिकरणात राहून उपचार घेण्याची अनुमती पालिकेकडून देण्यात आली आहे. लक्षणे असलेले आणि नसलेले जवळपास साडेसात हजार रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. त्याकरिता काही निकषही ठरवून देण्यात आले आहेत. तसेच, त्या निकषांचे पालन होते की नाही हे पाहण्याची यंत्रणाही लावण्यात आली आहे. पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात २० डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना लॅपटॉपसह इंटरनेट कनेक्शन व अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. डॉक्टर्स व्हिडिओ कॉलिंगद्वारे रुग्णांशी संपर्कात राहणार असून त्यांच्या दैनंदिन प्रगतीवर लक्ष ठेवणार होते. त्याकरिता डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आले होते. खासगी रुग्णालयांच्याच बरोबरीने पालिकेची आॅनलाईन यंत्रणा उभी राहणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात आले होते. परंतू, आरोग्य विभागाकडून येथील दूरध्वनी क्रमांकच रुग्णांना न दिल्याने या सेंटरवर फोनच आले नसल्याचे समोर आले आहे. 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका