शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

संमेलनाध्यक्षांच्या निधीबाबत स्थानिक शाखांचा नाही संबंध?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 01:23 IST

नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखाध्यक्षांची माहिती : मध्यवर्तीमध्ये संवादाचा अभाव

पुणे : नाट्य संमेलनाचा अध्यक्ष मध्यवर्ती नाट्य परिषदेकडून निवडला जातो. त्याची नियमावली, अटी मध्यवर्तीने घटनेद्वारे ठरविलेल्या आहेत. संमेलनाच्या संदर्भातल्या पूर्तता मातृसंस्थेनेच करणे अपेक्षित असते. संमेलनाध्यक्षांना पैसे अथवा मानधन देणार असू तर त्याची संपूर्ण जबाबदारी मध्यवर्तीची आहे. यात स्थानिक शाखांचा संबंध येतोच कुठे? जर संबंध असेल तर आजपर्यंत मध्यवर्तीने याची कोणतीच कल्पना शाखांना का दिली नाही? संमेलनाध्यक्षांना दीड लाख रुपयांच्या तरतुदीची माहिती देण्यासंबंधीचा चेंडू कोषाध्यक्षांनी स्थानिक शाखांकडे टोलवणे म्हणजे मध्यवर्ती आणि शाखांमध्ये संवाद नसण्याचे हे लक्षण आहे, अशी टीका करत नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी मध्यवर्ती नाट्य परिषदेच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नवीन घटनेनुसार नाट्यसंमेलनाध्यक्षांना वर्षभर एखादा प्रकल्प किंवा उपक्रम राबविण्यासाठी दीड लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष कीर्ती शिलेदार यांना या निर्णयाबाबत विंगेतच ठेवण्यात आले आहे. ‘नाट्यसंमेलनाध्यक्षांना अशी माहिती देणे, आम्हाला सयुक्तिक वाटत नाही. ही जबाबदारी स्थानिक शाखेची आहे’ असे सांगत मध्यवर्ती नाट्य परिषदेच्या कोषाध्यक्षांनी हा चेंडू पुण्यातील दोन शाखांकडे टोलविला आहे. यासंदर्भात नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला असता आमचा काहीही संबंध नसताना, शाखांना कोणतीही पूर्वकल्पना दिलेली नसताना शाखांनीच संमेलनाध्यक्षांना निधीच्या तरतुदीची माहिती दिली पाहिजे, हे मध्यवर्तीचे पदाधिकाऱ्याचे सांगणे ही दुर्दैवाची गोष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.नवीन पदाधिकारी कारभार हातात घेतात त्यांनी आर्थिक देवाणघेवाण याची माहिती जुन्या पदाधिकाºयांकडून घेणे अपेक्षित असते. मुळात जुन्या-नव्या पदाधिकाºयांची एकत्रित बैठक घेतली तेव्हा जुन्या पदाधिकाºयांकडून ही माहिती घेतली आहे का? असा प्रश्न पडतो.आर्थिक विषयासंदर्भात काही ठराव कायमस्वरूपी झालेले असतात. त्याची माहिती पदाधिकाºयांना असणे आवश्यक असते. नाट्य संमेलनाध्यक्ष हा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने बिनविरोध निवडलेला अध्यक्ष असतो. जुन्या-नवीन कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीवेळी नाट्य संमेलनाध्यक्ष कीर्ती शिलेदार उपस्थित होत्या. याच वेळी मध्यवर्तीने वर्षभर काय करणे अपेक्षित आहे याविषयीचे पत्र संंमेलनाध्यक्षांना द्यायला हवे होते. मात्र ते न करता स्थानिक शाखांवर जबाबदारी ढकलणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.या अशा गोष्टी होतात तेव्हा अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष यांच्यात संवादाचा अभाव असल्याचे दिसते. कार्यकारिणीच्या पूर्वी पदाधिकाºयांची बैठक होते. काही पत्र, विषय असतात त्याच्यावर चर्चा करून ते नियामक मंडळासमोर येतात.

टॅग्स :Puneपुणे