शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
3
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
4
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
5
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
6
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
7
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
8
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
9
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
10
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
11
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
12
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
13
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
14
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
15
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
16
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
17
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
18
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
19
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
20
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास

तिहेरी तलाक कायद्याचे राजकारण नको; शायरा बानो यांची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 13:00 IST

कुप्रथांमधून बाहेर पडण्यासाठी तिहेरी तलाकचा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्याचे पक्षीय राजकारण होऊ नये, अशी अपेक्षा तिहेरी तलाकविरोधात लढा उभा करणार्‍या शायरा बानो यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देन्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर समाजातील प्रथांमध्ये बदल होण्याची आशा : शायरा बानो मुस्लिम सत्यशोधक मंडळातर्फे वार्तालापाचे आयोजन

पुणे : तिहेरी तलाकसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे मुस्लिम महिलांवरील अन्याय, अत्याचार, शोषणाला आळा बसू शकेल. कुप्रथांमधून बाहेर पडण्यासाठी, तसेच नवीन पिढीच्या विकासासाठी तिहेरी तलाकचा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे कायद्याचे राजकीय भांडवल करून त्याचे पक्षीय राजकारण होऊ नये, अशी अपेक्षा तिहेरी तलाकविरोधात लढा उभा करणार्‍या शायरा बानो यांनी व्यक्त केली.  मुस्लिम सत्यशोधक मंडळातर्फे आयोजित वार्तालापात बानो यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी, बानो यांचे बंधू अर्शद अली, शकील अहमद हेदेखील उपस्थित होते. बानो म्हणाल्या, ‘तिहेरी तलाकविरोधात न्यायालयात अर्ज केल्यानंतर विविध संघटना, तसेच कुटुंबांचा पाठिंबा मिळाला. मात्र मुस्लिम बोर्ड, स्थानिक मौलवी यांच्यासह अनेक प्रतिगामी संघटनांकडून प्रचंड दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांनी प्रत्यक्ष भेटून, फोन करून अनेकदा याचिका मागे घेण्यासाठी धमकीवजा विनंती केली. त्यामुळे न्यायालयीन लढ्यात मोठा संघर्ष करावा लागला.’ याचवेळी अनेक महिला संघटनांनी मदत केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. अनेकदा सुशिक्षित मुस्लिम कुटुंबात तिहेरी तलाक दिला जात नाही. त्यामुळे तेथील महिलांना या कुप्रथेची तितकीशी जाणीव नसते. परंतु, हे दु:ख भोगाव्या लागणार्‍या महिलेची परिस्थिती बिकट असते. बानो यांचे बंधू अर्शद अली म्हणाले, ‘तिहेरी तलाकनंतर बहिणीने खूप त्रास सहन केला. सुरुवातीचा दीड महिना तिने एका शब्दानेही वाच्यताही केली नाही. मात्र, तिने याबाबत सांगितल्यानंतर न्यायालयीन लढा देण्याचा आम्ही निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत कायदा करण्यासाठी सरकारला दिलेल्या कालावधीतील दोन महिने संपले असून कायद्यात नेमके काय अपेक्षित होते, याविषयीची आमच्याकडे विचारणा केली नसल्याचे ते म्हणाले. 

 

मुस्लिम समाजात महिला अनेक वर्षांपासून अन्याय, अत्याचार, शोषण सहन करत आल्या आहेत. न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर समाजातील प्रथांमध्ये बदल होण्याची आशा निर्माण झाली आहे. मात्र, न्यायालयाचा निकाल सहजासहजी स्वीकारण्याची मानसिकता अद्याप तयार झालेली नाही. मानसिकता बदलण्यासाठी जनजागृती होण्याची गरज आहे.- शायरा बानो ---------- 

टॅग्स :Muslimमुस्लीमSupreme Courtसर्वोच्च न्यायालय