शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
4
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
5
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
6
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
8
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
9
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
10
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
11
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
12
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
13
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
14
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
15
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
16
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
17
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
18
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
19
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
20
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न

संस्था, संघटनांना पे पार्किंग नको; दर्शवला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 3:16 AM

महापालिकेच स्थायी समितीच्या सभेत मंजुरी घेऊन सर्वसाधारण सभेत आणण्यात येणाऱ्या वाहनतळ धोरणाला शहरातील संस्था, संघटनांनीही विरोध दर्शवला आहे. काही पक्षांनी त्याविरोधात गुरुवारी महापालिका मुख्यालयात आंदोलनही केले.

पुणे : महापालिकेच स्थायी समितीच्या सभेत मंजुरी घेऊन सर्वसाधारण सभेत आणण्यात येणाऱ्या वाहनतळ धोरणाला शहरातील संस्था, संघटनांनीही विरोध दर्शवला आहे. काही पक्षांनी त्याविरोधात गुरुवारी महापालिका मुख्यालयात आंदोलनही केले.आप पक्षाच्या वतीने महापालिका प्रवेशद्वारासमोर निदर्शने करण्यात आली. जनतेला विश्वासात न घेता या धोरणाला मंजुरी देण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला. सुलभ नियम, भ्रष्टाचारमुक्त अंमलबजावणी व प्रबोधन यासह हे धोरण अवलंबण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. सुभाष कारंडे, सय्यद अली, सतीश यादव, राजेश चौधरी, किशोर मुजुमदार, गजानन भोसले, सुरेंद्र पुरोहित, नितीन बर्वे, विजय गायकवाड, गणराज ताटे, संदेश दिवेकर, मनोज थोरात, अर्शद अन्सारी, केदार ढमाले, गणेश वैराट, फरहान शेख, आनंद अंकुश, मुकुंद किर्दत आदी आंदोलनात सहभागी झाले होते.हमारी अपनी पार्टी पक्षानेही महापौर मुक्ता टिळक यांना पत्र पाठवून या धोरणाला मंजूरी देऊ नये, अशी मागणी केली आहे. पुणे शहर अध्यक्ष राजेश अगरवाल यांनी सांगितले, की महापौरांची भेट घेण्यासाठी गेलो असताना त्यांनी भेट दिली नाही, याचा निषेध म्हणून महापालिका मुख्यालयात धोरणाच्या विरोधात घोषणा दिल्या.माजी आमदार मोहन जोशी यांनी या धोरणाच्या विरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा दिला. महापालिका व आरटीओसुद्धा नागरिकांकडून रस्त्यासाठीचा कर घेत असते, असे असताना आता पुन्हा पार्किंगसाठी शुल्क अदा करावे लागणे अयोग्य आहे, असे जोशी म्हणाले. काँग्रेसचेच प्रदेश कार्यकारिणी सदस्य संजय बालगुडे यांनी या विषयावर पालकमंत्री गिरीश बापट व खासदार अनिल शिरोळे यांनी त्यांची भूमिका पुणेकरांसाठी जाहीर करावी, अशी मागणी केली.

टॅग्स :Parkingपार्किंग