शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक! यंदाचा पुरुषोत्तम करंडक कोणालाच नाही; स्पर्धेस पात्र एकही एकांकिका नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 23:39 IST

सांघिक प्रथम पुरुषोत्तम करंडक कोणालाही कोणालाही देण्यात आला नसून रोख परितोषीक पुणे इन्स्टिटय़ूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या कलीगमन या एकांकिकेस देण्यात येत आहे.

पुणे : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या पुरुषोत्तम करंडकास पात्र एकही एकांकिका नसल्याने यंदाचा करंडक कोणालाही देण्यात आलेला नाही.  महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी शनिवार आणि रविवारी या दोन दिवसात पार पडली. अंतिम फेरीत नऊ महाविद्यालयांच्या संघाची निवड करण्यात आली होती. पण यंदाच्या अंतिम फेरीत चुरशीची लढत पाहायला मिळाली नाही. त्यामुळे स्पर्धेच्या परीक्षकांनी कोणत्याच महाविद्यालयाला पुरुषोत्तम जयराम करंडक न दिल्याचे निकालात सांगितले आहे. 

सांघिक प्रथम पुरुषोत्तम करंडक कोणालाही कोणालाही देण्यात आला नसून रोख परितोषीक पुणे इन्स्टिटय़ूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या कलीगमन या एकांकिकेस देण्यात येत आहे. सांघिक द्वितीय हरी विनायक करंडक बारामतीतील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या भु - भु एकांकिकेस देण्यात येत आहे. तर सांघिक तृतीय संजीव करंडक मॉडर्न कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या गाभारा या एकांकिकेला देण्यात आला आहे. तर सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका म्हणून देण्यात येणारा जयराम करंडक यंदा कोणालाही देण्यात आलेला नाही. परेश मोकाशी, हिमांशू स्मार्त आणि पौर्णिमा मनोहे यांनी अंतिम फेरीचे परीक्षण केले. 

अंतिम फेरीत या संघांचे सादरीकरण झाले 

शनिवारी फर्ग्युसन महाविद्यालय (आद्य), मॉर्डन कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालय (गाभारा) आणि मॉर्डन महाविद्यालय, गणेशखिंड (अहो, ऐकताय ना?) हे संघ सादरीकरण झाले. तर रविवारी सकाळी ९ ते दुपारी 12 यावेळेत टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय (काय झाडी, काय डोंगार, काय हाटील), कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय (चाराणे) आणि पीआयसीटी महाविद्यालय (कलिगमन) या महाविद्यालयांचे संघ सादरीकरण करतील. याच दिवशी सायंकाळी पाच ते रात्री आठ यावेळेत तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती (भू भू), डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, आकुर्डी (एक्सपायरी डेट)आणि अभियांत्रिकी महाविद्यालय (ओंजळभर चंद्र) या महाविद्यालयांच्या संघांचे सादरीकरण झाले.