शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
5
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

कलाकृती सशक्त असेल तर पार्श्वसंगीताची गरज नाही : राहुल रानडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 21:11 IST

नेपथ्य, संगीत याशिवायही नाटक होऊ शकते.

पुणे : संगीत देण्यासाठी नाटक हे आवडीचे माध्यम आहे. नाटकाला पार्श्वसंगीताची गरज असते का? तर नसते. आपल्याला पार्श्वसंगीताची सवय झाली आहे. नेपथ्य, संगीत याशिवायही नाटक होऊ शकते. पण तांत्रिक बाजूंचा उपयोग नाटय अधिक प्रभावी होण्यासाठी केला जाऊ शकतो. तो परिणाम मात्र अचूक साधता आला पाहिजे. मुळात कलाकृती जर सशक्त असेल तर पार्श्वसंगीताची आवश्यकता नाही असे प्रतिपादन संगीतकार राहुल रानडे यांनी केले. समरस होऊन केलेले काम हे यशाचे गमक असल्याचेही ते म्हणाले. शतकोत्तर रौप्यमहोत्सवर्षाची अखंड परंपरा असलेल्या भरत नाटय संशोधन मंदिर आणि संवाद पुणेतर्फे नाट्य-तंत्रज्ञ संमेलनात ‘संगीत’ या विषयावर त्यांच्याशी ज्येष्ठ समीक्षक राज काझी यांनी संवाद साधला. नाटक, सिनेमाला दिले जाणारे पार्श्वसंगीत याविषयी विवेचन करतानाच ‘भरत’च्या रंगमंचावरील प्रयोग ते व्यावसायिक नाटक-चित्रपटाला दिलेले संगीत येथपर्यंतचा प्रवास सांगून संगीताचे काही प्रकार त्यांनी रसिकांना ऐकवले. ग्रीप्स रंगभूमीवरील अनुभवही त्यांनी सांगितले.नाटकाला दिलेले संगीत हे अस्तर लावल्यासारखे असते. संगीत हे नाटकातील पात्रच आहे, असे समजून नाटकाला संगीत देण्याचा प्रयत्न करतो, पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत तांत्रिक बाजूंना पारितोषिक दिले जात नाही. दिले जावे की न दिले जावे याचा दोन्ही बाजूने विचार व्हायला हवा. ज्या स्पर्धांमध्ये तांत्रिक बाजूंसाठी पारितोषिक असते त्या स्पर्धांमध्ये तंत्रज्ञ लक्ष देऊन काम करतात का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.दृश्य दिसले की सूर उमटतात. नाटकाची तालीम बघून पार्श्वसंगीत किती आवश्यक आहे याचा विचार करुन मी संगीत देतो. आवश्यकता नसेल तर दिग्दर्शकाला तसेही सांगतो. नाटकात संगीत कुठे सुरू करायचे? कुठे थांबवायचे हे ठरवावे लागते. हा विचार करताना कलाकारांने जागा, संवाद विसरता कामा नये याकडेही रानडे यांनी लक्ष वेधले.कार्यक्रमाच्या सुरुवातीस भरत नाट्य मंदिराचे अध्यक्ष आनंद पानसे यांनी स्वागत केले. भरत नाटय मंदिराचे कार्याध्यक्ष अभय जबडे यांनी सूत्रसंचालन केले. संवाद पुणेचे सुनिल महाजन उपस्थित होते. 

टॅग्स :PuneपुणेmusicसंगीतartकलाTheatreनाटक