शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

संगीत नाटकांसाठी सेलिब्रेटींवर अवलंबून राहण्यात अर्थ नाही : कीर्ती शिलेदार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 16:30 IST

आगामी काळात ती परंपरा आत्मीयतेने जपल्यास संगीत नाटक पुन्हा ताकदीने उभे राहील. मात्र, आता कलेसाठी आयुष्य पणाला लावणारे कुणी दिसत नाही. प्रत्येकाला झटपट यश आणि प्रसिध्दी हवी आहे.

ठळक मुद्देमसाप गप्पांतून उलगडला नाट्यसंगीताचा पट  तरुण कलाकारांचे आयुष्य धावपळीचेसंगीत नाटकांची शुध्द मराठी भाषा हे आपल्या भाषेची श्रीमंती

पुणे : नव्या दमाच्या गायक, कलाकार मंडळींना आपले पूर्वसुरीचे नाट्यसंगीताचे संचित जपण्याची आस नाही. ते जपावे यासाठी ती प्रयत्नशील असल्याचे वाटत नाही. आगामी काळात ती परंपरा आत्मीयतेने जपल्यास संगीत नाटक पुन्हा ताकदीने उभे राहील. मात्र, आता कलेसाठी आयुष्य पणाला लावणारे कुणी दिसत नाही. प्रत्येकाला झटपट यश आणि प्रसिध्दी हवी असून संगीत नाटकांसाठी सेलिब्रेटींवर अवलंबून राहण्यात काही अर्थ नाही. असे परखड मत संगीत नाट्यरंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांनी व्यक्त केली.   महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मसाप गप्पा या कार्यक्रमात शिलेदार यांच्याशी अभिनेते व नाट्यअभ्यासक सुरेश साखोळकर यांनी संवाद साधला. शिलेदार यांनी आपल्या संगीत नाट्यप्रवासाबद्दलच्या विविध आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांनी सध्याच्या मनोरंजनाचा भडिमार, रसिकांचा घसरत चाललेला दर्जा यावरही आपले रोखठोक मते व्यक्त केली. त्या म्हणाल्या, तरुण कलाकारांचे आयुष्य धावपळीचे झाले आहे. त्यांना आपण ज्या कलामाध्यमांत काम करतो त्याचा ध्यास लागत नाही. एकाचवेळी अनेक कामे करण्याची घाई त्यामुळे त्या कलाकाराकडून काय अपेक्षा करणार?, आमच्यावेळी आयुष्यपणाला लावून काम करणारे कलाकार होते. कलेप्रती त्यांनी घेतलेला ध्यास त्यांच्या कामातून दिसून यायचा. आता तसे होत नाही. परंपरा आणि नाविन्य यांचा मिलाफ झाल्यास रसिक तुमच्या कलेचा आस्वाद घेण्यास येतील. आताच्या नवीन कलाकारांना भाषा, तिचा योग्य वापर, याबद्द्ल विशेष आनंद  नसल्याचे दिसून येते. अण्णासाहेब किर्लोस्कार, गोविंद बल्लाळ देवल, काका खाडिलकर आणि राम गणेश गडकरी यासारख्या भाषाप्रभुंच्या नाटकांत काम करण्याची संधी मिळाली. त्या नाटकांमधील शुध्द मराठी भाषा हे आपल्या भाषेची श्रीमंती म्हणावी लागेल. मात्र नवीन कलाकारांनी ही भाषा झेपत नाही. संगीतनाट्याविषयी काय बोलावे? असा प्रश्न पडतो. आताचा काळ विचित्र करमणुकीचा आहे. त्यातून रसिकांची बहुश्रृतता कमी झाली आहे. ज्यापध्दतीने एखाद्या श्वापदाला मारण्याअगोदर घायाळ केले जाते तसे रसिक मनोरंजनाच्या भडिमारामुळे मृतावस्थेत जात आहे. संगीत नाट्य सुरु राहावे यासाठी रसिकांनी संगीत नाट्याच्या बैठक आयोजित करायला हव्यात. घरात आपल्यावर टीव्हीच्या माध्यमातून ज्यापध्दतीच्या मनोरंजनाचा भडिमार होतो आहे त्याकडे पाठ फिरवून संगीत नाटकांच्या बैठका सुरु झाल्यास भारतीय नाट्य संगीत परंपरा मुळपदावर येईल. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtra Sahitya Parishadमहाराष्ट्र साहित्य परिषद