शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या अर्थसंकल्पात नाही अपेक्षित तरतूद ; धनगर समाजात प्रचंड नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 17:54 IST

‘राष्ट्रवादी'च्या पदाधिकाऱ्यांचा पक्षालाच घरचा आहेर  

बारामती: राज्याच्या अर्थसंकल्पात धनगर समाजासाठी अपेक्षित तरतुद केलेली नाही. त्यामुळे समाजात प्रचंड नाराजी पसरली आहे. तरी धनगर समाज राज्य शासनाच्या अर्थसंकल्पाचा निषेध करीत आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दौंड तालुका पक्ष निरीक्षक बापुराव सोलनकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातारा जिल्हा महिला पक्ष निरीक्षक डॉ. अर्चना पाटील या राष्ट्रवादीच्या दोघा पदाधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. सोलनकर आणि डॉ पाटील यांच्याशिवाय समाजाच्यावतीने गणपत देवकाते, डॉ. अर्चना पाटील, संपतराव टकले, बापुराव सोलनकर, वसंतराव घुले, चंद्रकांत वाघमोडे यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांची भूमिका स्पष्ट केली. पाठीमागील सरकारने धनगर समाजाला २२ योजनांसाठी १००० कोटींची घोषणा केली होती.मात्र, त्याची तरतुद झाली नाही. शासनाने समाजाबाबत दुजाभाव केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

यावेळी विविध मागण्या शासनाकडे करण्यात आल्या आहेत. महाराजा यशवंतराव होळकर यांच्या नावाने उद्योजक महामंडळ स्थापन करून उद्योजकांना आर्थिक अनुदान द्यावे, अहिल्यादेवी घरकल योजना केली आहे. ती फक्त भटक्या विमुक्त जाती यांनाच या योजनेचा लाभ मिळावा. अहिल्यादेवी विकास महामंडळास आर्थिक तरतूद करण्यात यावी. राज्यात प्रत्येक तालुक्यात धनगर समाजासाठी सरकारी जागेसह सामाजिक सभागृह देण्यात यावे. 

राज्यात प्रत्येक तालुक्यात धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी सरकारी जागेसह वस्तीगृह करावे. वाफगाव (ता. खेड, जि. पुणे) येथे येथे यशवंतराव होळकर यांचे अंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक करावे. मेंढपाळ बांधवांसाठी १ रूपयामध्ये १० लाख रूपयाचा अपघाती व नैसर्गीक अपत्ती विमा व शेळीमेंढीसाठी विमा लागु करावा आदी मागण्यांचा यामध्ये समावेश आहे.————————————...त्यावर ‘रयत’ मालकी हक्क कसा काय दाखवते ? वाफगाव (ता. खेड, जि. पुणे) येथे येथे यशवंतराव होळकर यांचे अंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक करावे.हे शुर राजाचे प्रतिक आहे.त्यावर रयत शिक्षण संस्था मालकी हक्क कसा काय दाखवते,असा सवाल  राष्ट्रवादीचे पदाधिकारी बापुराव सोलनकर यांनी केला आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीNCPराष्ट्रवादी काँग्रेसDhangar Reservationधनगर आरक्षणBudgetअर्थसंकल्प