शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

रेशनच्या तुरडाळीला ग्राहक मिळेनात, वितरकांची ओरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 21:11 IST

यंदा तूरीचे उत्पादन चांगले झाल्यामुळे पुरवठा विभागाने सर्व शिधापत्रिकाधारकाला स्वस्त धान्य दुकानात तुरडाळ विक्रीसाठी ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु, ‘रेशनची डाळ शिजत नाही’, अशी काही नागरिकांची चुकीची धारणा झाली आहे.

ठळक मुद्देसोमवारी यासंदर्भात प्राप्त होणा-या अहवालावरून चित्र स्पष्टतक्रार न करता वितरकांना आपल्या भागातील शिधापत्रिका धारकांना तुरडाळ विकावीच लागणार

पुणे: स्वस्त धान्य दुकानांमधून गहू, तांदूळ या धान्यांसह तूरडाळीचे वितरण केले जात असले तरी, ‘रेशनची डाळ शिजत नाही’, अशी काही नागरिकांची चुकीची धारणा झाली आहे. तसेच ग्राहकांकडून या तुरडाळीला फारशी मागणी नाही. त्यामुळे रेशनच्या तुरडाळीला ग्राहक मिळेनात,असे स्वस्त धान्य वितरकांकडून सांगितले जात आहे.मात्र,येत्या सोमवारी यासंदर्भात प्राप्त होणा-या अहवालावरून चित्र स्पष्ट होईल. यंदा तूरीचे उत्पादन चांगले झाल्यामुळे पुरवठा विभागाने सर्व शिधापत्रिकाधारकाला स्वस्त धान्य दुकानात तुरडाळ विक्रीसाठी ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेल्या काही महिन्यांपासून स्वस्त धान्य दुकानांमध्ये ५५ रुपये प्रतिकिलो दराने तुरडाळ विकली जात आहे. त्याचप्रमाणे डाळ चांगल्या दर्जाची असल्याचा दावाही विभागाने केला आहे. परंतु, घाऊक बाजारात ६० ते ७० रुपये प्रतिकिलो तुरडाळ विक्रीसाठी उपलब्ध आहे. मात्र, दोन्ही दाळींच्या दरात फारसा फरक नाही. त्यामुळे या तूरडाळीस उठाव नाही. परिणामी अन्न धान्य वितरकांकडून ही डाळ उचलली जात नसल्याची माहिती समोर आली आहे. ग्राहकांना गहू, तांदूळ या धान्याबरोबरच तुरडाळीचे वितरण करणे अपेक्षित आहे. काही वितरकांकडून तुरडाळ उचलली जात नसल्याने संबंधित वितरकांना गहू व तांदूळाचेही वितरण करू नका, अशा सूचना अन्न धान्य वितरण अधिका-यांनी दिले आहेत. परिणामी कोणतीही तक्रार न करता वितरकांना आपल्या भागातील शिधापत्रिका धारकांना तुरडाळ विकावीच लागणार आहे. दरम्यान, एका अन्न धान्य वितरकाने सांगितले,काही महिन्यांपासून तुरडाळ विक्रीसाठी उपलब्ध आहे. एका महिन्याला २५ ते ५० किलोच तुरडाळीची विक्री होते. रेशनची तूरडाळ शिजत नाही, अशी नागरिकांची धारणा झालेली आहे. मात्र, सर्वांना तुरडाळ विक्रीच्या सुचना प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे पुरवठा विभागाकडून दिली जाणारी सर्व तूरडाळ ग्राहकांना विकण्याचा प्रयत्न करावा लागेल.---------------------------शहरात सर्वत्र तुरडाळीची विक्री सुरळीतपणे सुरू आहे. तसेच कोणत्या भागात कोणत्या दुकानात किती किलो तुरडाळीची विक्री झाली याबाबतची माहिती जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.येत्या सोमवारी सर्व दुुकानांची माहिती प्राप्त होईल. त्यावरून शरातील तुरडाळ विक्रीबाबतचे चित्र स्पष्ट होेईल.- आर.बी.पोटे, अन्न धान्य पुरवठा अधिकारी ,पुणे शहर  

टॅग्स :Puneपुणेpigeonsकबुतर