शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

निजामुद्दीन कार्यक्रमातील सहभागी तिघांसह कदमवाकवस्ती परिसरात ७ जण होम क्वारंटाईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 16:31 IST

चेन्नई येथून ३ तर नेपाळ येथून आलेल्या एकाचा समावेश

ठळक मुद्दे७ नागरिकांमध्ये सध्या तरी कोरोनाची लक्षणे आढळुन आलेली नाहीत.

लोणी काळभोर : दिल्लीच्या निजामुद्दीन भागात काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मोठ्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे दिसू लागली आहेत. या तब्लिगी ए-जमातच्या कार्यक्रमात कदमवाकवस्ती ग्रामपंचायत परिसरातील ३ जण सहभागी झाल्याचे आढळून आले आहे. याचबरोबर या परिसरात चेन्नई येथून ३ तर नेपाळ येथून १ जण आलेला आहे. या सर्वांची तपासणी करण्यात आली असून त्यांना कोणताही त्रास होत नाही. या सर्वांचे होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.             प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कदमवाकवस्ती हद्दीत  ग्रामपंचायतीच्या वतीने डॉ. रतन काळभोर व त्यांचे सहकारी नागरीकांची तपासणी करत आहेत. त्यांना तपासणीत ९ जण संशयित आढळून आले. त्यांतील ३ जण दिल्लीमधील निजामुद्दीन परिसरात  तब्लिगी ए-जमात या संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांत सहभागी झाले होते. तर ३ जण चेन्नई येथून व नेपाळ येथून १ जण आलेला आहे असे समजले. डॉ. रतन काळभोर यांनी या सर्वांना तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रांशी संपर्क साधला. व आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव यांना सदर माहिती दिली. डॉ. जाधव यांनी सर्वांची तपासणी केली. त्यावेळी आजअखेर त्यांना कोणताही त्रास होत नाही हे लक्षात आले. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून ९ पैकी ७ जणांना होम क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे.            दिल्लीमधील निजामुद्दीन परिसरात तब्लिगी ए-जमात या संघटनेच्या वतीने तबलीगी जमानत हा कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम नुकताच  पार पडला. कार्यक्रमासाठी भारताच्या विविध भागातून तसेच विदेशातून देखील मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. हजारो लोक हे निजामुद्दीनमधील दर्ग्यामधील तब्लिगी जमातच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते आणि त्यातील काही जण हे आधीच कोरोनाबाधित होते. त्यातील काही लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे. या कार्यक्रमात पुणे परिसरातील ९२ जण सहभागी झाल्याचे आढळून आले आहे. यापैकी ३५ जणांना नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आता  त्यामध्ये पिंपरी - चिंचवड शहरातील तब्बल ३२ नागरिक सहभागी झाल्याची माहिती समोर आली असून त्यापैकी १४ जणांचा महापालिकेने शोध घेतला असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. आणखी १८ नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.    प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी काळभोर आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव निजामुद्दीन भागात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेले तीन जण याचबरोबर चेन्नई येथून आलेले ३ व नेपाळ वरून आलेला १ अश्या एकूण ७ नागरीकामध्ये सध्या तरी कोरोनाची लक्षणे आढळुन आलेली नाहीत. मात्र संबधितांना पुढील पंधरा दिवसाकरीता आपआपल्या घरातच थांबण्याच्या लेखी सुचना दिल्या आहेत. तसेच इतरांशी संपर्क टाळण्याबाबत सांगितले आहे. त्यांचेवर होम कोरेटांईनचे शिक्के मारण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून दिल्ली येथून आलेले ३ व नेपाळ वरून आलेला १ अश्या ४ जनांना पुणे येथील नायडू रूग्णालयात पाठवण्यात येणार आहे. दिल्ली अथवा परदेशातून कोणी आले असेल तर त्यांनी आरोग्य केंद्रात येवून तपासणी करून घ्यावी असे अवाहन त्यांनी केले आहे.

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdelhiदिल्लीMuslimमुस्लीमdoctorडॉक्टर