शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एनजीओच्या कार्यकर्त्यांनी पकडले तोतया भिक्षेकरी, कोंढव्यातील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 22:31 IST

अपंगत्वाचे सोंग घेऊन भिक्षा मागणा-या एका महिलेसह साथीदारांची तोतयेगिरी कोंढव्यातील एका सामाजिक संस्थेने उघडकीस आणली. व्हिलचेअरवर बसून पदरात लहानग्याला घेऊन लोकांची सहानुभूती मिळवून पैसे उकळत असतानाच या महिलेला पकडण्यात आले.

पुणे : अपंगत्वाचे सोंग घेऊन भिक्षा मागणा-या एका महिलेसह साथीदारांची तोतयेगिरी कोंढव्यातील एका सामाजिक संस्थेने उघडकीस आणली. व्हिलचेअरवर बसून पदरात लहानग्याला घेऊन लोकांची सहानुभूती मिळवून पैसे उकळत असतानाच या महिलेला पकडण्यात आले. दोन्ही पाय नसल्याचा तिचा बनाव उघडकीस येताच व्हिलचेअरवर बसलेली ही महिला साथीदारासह बाळाला घेऊन पसार झाली. ही घटना कोंढव्यामध्ये मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला. कोंढव्यामध्ये फ्यूचर फाऊंडेशन या संस्थेचे कार्यालय आहे. समिना शेख, शबाना कॉन्ट्रॅक्टर, शायनाज शेख या पदाधिकारी संस्थेच्या कार्यालयामध्ये बसून काम करीत होत्या. त्यावेळी कार्यालयाजवळून स्पिकरवर आवाज येऊ लागला.  ‘या महिलेला मदतीची गरज आहे. तिला पती नाही, दोन लहान मुले आहेत. मदत करा.’ अशा आशयाचे आवाहन स्पिकरवर वाजत होते. समिना, शबाना आणि शायनाज यांनी बाहेर जाऊन पाहिले असता एका व्हिलचेअरवर बसून एक महिला भिक मागत होती. तिच्या मांडीवर एक लहान बाळ होते. तर, ही व्हिलचेअर 20 वर्षांचा एक युवक ढकलत असल्याचे दिसले. या महिलेच्या मांडीवर चादर पांघरलेली होती.व्हिलचेअरला भोंगा बसविण्यात आलेला होता. टेपरेकॉर्डर लावून त्यावर मदतीचे आवाहन असलेली कॅसेट सुरु होती. इमारतीमधील रहिवासी आणि वाहनचालक थांबून या महिलेला आर्थिक मदत करीत होते. या सर्व प्रकाराबाबत कार्यकर्त्यांना संशय आला. त्यांनी थांबून महिलेकडे चौकशी केली असता तिने तिचे नाव राना खातून सांगितले. तर तिच्या सहका-याचे नाव मोहम्मद आलम असल्याचे सांगितले. तिला पायावरील चादर काढण्यास सांगितले असता तिने नकार दिला. कार्यकर्त्यांनी ही चादर दूर केली असता तिला पाय असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तिने पोलिओ झाल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांना बोलावण्यात येत असल्याचे समजताच ही महिला बाळाला घेऊन चालू लागली. आपल्यावर कारवाई होईल या भितीने ही महिला, तिचा सहकारी बाळाला घेऊन पसार झाले. हा सर्व प्रकार तासभर सुरु होता. पोलिसांना कळवूनही त्यांनी कारवाई न केल्याचे समिना शेख यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे