शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पुढील वर्षी ब्लॉक स्तरावरील हवामान अंदाज, प्रत्युष या उच्च क्षमतेच्या सुपर कॉम्प्युटरचे लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 20:12 IST

राष्ट्रीय मान्सून मिशनअंतर्गत देशात प्रत्येक १२ किलोमीटर परिसरातील हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

पुणे : राष्ट्रीय मान्सून मिशनअंतर्गत देशात प्रत्येक १२ किलोमीटर परिसरातील हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या जिल्हा व काही तालुका स्तरावर ही यंत्रणा आहे. पुढील वर्षीपासून प्रत्येक ब्लॉकचा अंदाज वर्तविला जाईल. त्यानुसार तयारी सुरू असल्याची माहिती केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.पाषाण येथील इंडियन इन्स्टिट्युट आॅफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (आयआयटीएम) मध्ये कार्यान्वित करण्यात आलेल्या प्रत्युष या उच्च क्षमतेच्या सुपर कॉम्प्युटरच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार अनिल शिरोळे, केंद्रीय भू विज्ञान विभागाचे सचिव एम. राजीवन, सह सचिव डॉ. विपिन चंद्र, आयआयटीएमचे संचालक प्रा. रवी एस. नंजुनदिहा, हाय परफॉर्मन्स काम्प्युटिंग (एचपीसी)चे प्रकल्प संचालक डॉ. ए. सूर्यचंद्र राव उपस्थित होते.डॉ. हर्षवर्धन म्हणाले, प्रत्युषचे लोकार्पण ही संपूर्ण देशवासीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे. एचपीसी प्रणालीअंतर्गत आतापर्यंत भारतात सुपर कॉम्प्युटरची क्षमता १ पेटाफ्लॉपपर्यंत होती. आयआयटीएममधील कॉम्प्युटरची क्षमता ४ पेटाफ्लॉप असून, नोएडा येथील संस्थेत पुढील आठवड्यात २.८ पेटाफ्लॉप क्षमतेचा संगणक विकसित करण्यात आला आहे. त्यामुळे हवामानाच्या क्षेत्रात होत असलेल्या विविध संशोधनाचा वेग वाढणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात भारत चौथ्या स्थानी पोहोचणार आहे. त्यामुळे हवामान, त्सुनामी, वादळ, भूकंप यांसह विविध नैसर्गिक आपत्तींचा अधिक अचूक अंदाज वर्तविणे शक्य होणार आहे.या संगणकासाठी ४५० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. राष्ट्रीय मान्सून मिशनअंतर्गत सध्या विविध प्रकल्पांवर काम सुरू आहे. त्यामुळे पुढील काही वर्षात नैसर्गिक आपत्तींबाबत अधिक अचूकता येणार आहे. विभागामार्फत सध्या देशभरातील २ कोटी ४० लाख शेतक-यांपर्यंत हवामानविषयक माहिती थेट मोबाईलवर दिली जात आहे. २०१९ पर्यंत ४ कोटी ५० लाख शेतक-यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. तर भविष्यात ९ कोटी ३० लाख मिलियन शेतक-यांचे ध्येय निश्चित करण्यात आल्याचे हर्षवर्धन यांनी सांगितले.दरम्यान, प्रत्युषमुळे अधिक खोलवर आणि वेगाने संशोधन करणे, हवामानाचा अचूक अंदाज वर्तविणे शक्य होणार आहे. तसेच हवामान आणि जलवायू क्षेत्रामध्ये काम करणा-या अन्य संशोधन संस्थांनाही त्याचा मोठा फायदा होणार आहे.------------------------निधीची कमतरता नाहीविज्ञान व तंत्रज्ञान विभाग तसेच संशोधनाला कमी निधी मिळत असल्याची ओरड चुकीची असून केंद्र सरकार सुरूवातीपासून याबाबतीत सकारात्मक असल्याचे डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले. देशातील संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने कोट्यावधी रुपये दिले आहेत. तसेच सर्व संशोधन संस्थामध्येही आता चांगला समन्वय होत असल्याचे त्यांनी सांगितले.