शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
2
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
3
"माझी चूक काय? २० वर्ष मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिली, तरीही..."; भाजपा महिला आमदाराला अश्रू अनावर
4
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
5
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
6
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
7
ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली
8
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
9
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
10
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
11
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
12
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
13
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
14
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
15
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
16
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
17
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन
18
वर्चस्व गाजवूनही पाकचे एका गुणावर समाधान; पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंडचा पराभव टळला
19
‘राष्ट्रकुल’चे यजमानपद अहमदाबादला; कार्यकारी मंडळाची शिफारस
20
औषधांच्या कठाेर गुणवत्ता तपासणीसाठी आता कायदा; विषारी सिरप प्रकरणानंतर केंद्र सरकारने घेतला निर्णय

लोकमतच्या बातमीची दखल, तळेगाव-चाकण रस्त्याच्या दुरुस्तीचे अखेर झाले उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2018 22:54 IST

औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या वाहतुकीमुळे तळेगाव-चाकण-शिक्रापूर हा रस्ता अतिशय वर्दळीचा आणि धोकादायक बनला आहे.

चाकण - औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या वाहतुकीमुळे तळेगाव-चाकण-शिक्रापूर हा रस्ता अतिशय वर्दळीचा आणि धोकादायक बनला आहे. आमदार सुरेश गोरे यांनी वेळोवेळी सदर रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून रस्त्याचा विषय अनेक प्रकारे अधिवेशनात मांडून त्याचा सतत पाठपुरावा घेतला. त्याचप्रमाणे 'लोकमत'ने वेळोवेळी या रस्त्याबाबत सचित्र वार्तांकन करून आवाज उठवला होता. अखेर या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाचे उदघाटन करण्यात आले. दरम्यानच्या काळात सदर रस्ता राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्याने केंद्राकडे याबाबतचा पाठपुरावा शासन करणार असल्याची माहिती राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी आमदार सुरेश गोरे यांना हिवाळी अधिवेशन २०१६ मधे उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेमधे दिली होती. त्या अनुषंगाने आमदार सुरेश गोरे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडून रस्ता दुरुस्त करण्याची सतत मागणी केली. त्यांच्या मागणीच्या अनुषंगाने काम मंजूर झाले असून तळेगाव ते चाकणमधील २४ किमीचे मजबुतीकरण व डांबरीकरण असे १०.८९ कोटी रुपयाचे काम नुकतेच मंजूर झाले असून ऍशकॉन इंफ्रा प्रा.लि. यांनी हे काम घेतले आहे. सहा महिन्याच्या कालावधीत पूर्ण करण्याचे प्रस्तावित असून आमदार गोरे यांनी एका महिन्यातच काम पूर्ण करण्याच्या सूचना संबधित अधिकारी तसेच ठेकेदार यांना दिल्या आहेत. सन २०१० पासून सदर रस्ता दुरुस्ती किंवा नव्याने करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रलंबित होता. २५ फेब्रुवारी २०१० रोजी मंत्रिमंडळ बैठकीत या रस्त्याचा चौपदरीकरणाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. ०६ फेब्रुवारी २०१३ रोजी तत्कालीन उप-मुख्यमंत्री यांच्याकडे यांच्याकडे सहापदरीकरणाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. ०२ ऑगस्ट २०१३ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४८० कोटी रुपयांचा पुनर्नियोजनाचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. परंतु प्रकल्पाची वाढलेली किंमत आणि नवीन पथकर धोरणामुळे खासगीकरणामधून करण्यात येणारा रस्ता मंजूर झाला नाही.त्यानंतर आमदार गोरे यांनी रस्ता मंजूर करण्यासाठी जवळपास २ वर्षे सातत्याने राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. परंतु २३ जून २०१६ रोजी सदर रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग म्हणून तत्वत: मान्यता मिळाली आणि रस्ता केंद्र सरकारकडे वर्ग झाल्याने पुन्हा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून दुरुस्तीसाठी या रस्त्याला १०.८९ कोटी रुपये मंजूर करून आणण्यात गोरे यांना यश आले.  महामार्गावरील खड्डे बुजविल्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होवून वाहतूक कोंडी सुरळीत होण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. तसेच केंद्र शासनाकडून राष्ट्रीय महामार्गाचे ( ५४८ डी ) चे प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरु असून या रस्त्यासाठी १८०० कोटी रुपये खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या मार्फत मंजूर करण्यात आले आहेत. लवकरच प्रकल्प अहवाल मंजूर करून सहापदरी रस्त्याचे काम सुरु होणार असल्याचे आमदार सुरेश गोरे यांनी यावेळी सांगतले.