सासवडच्या जगताप परिवारातील हनुमंत जगताप यांचे चिरंजीव अविनाश व राजापूर येथील राजेंद्र बबनराव राजेघाडगे यांची कन्या रुपाली यांचा विवाह सोहळा फलटण नजीक सुरवडी येथील रॉयल पॅलेसमध्ये नुकताच संपन्न झाला. या विवाहात स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानचे संतोष जगताप यांच्या संकल्पनेतून हा अनोखा रक्तदान सोहळा संपन्न झाला. वधू वराकडील २६ जणांनी रक्तदानाचा हक्क बजावला .
माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी या उपक्रमाला हजेरी लावत प्रतिष्ठानचे अभिनंदन केले . जगताप परिवारातील माजी उपनगराध्यक्ष वामनराव जगताप, बाजार समितीचे भानूकाका जगताप यांसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. वऱ्हाडी मंडळींना यावेळी मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले . हडपसरच्या अक्षय ब्लूडबँकेने या उपक्रमाला साहाय्य केले . एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाच्या या विवाहाबद्दल अनेकांनी दोन्ही परिवाराचे अभिनंदन केले.