शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

नव्याने निर्माण झालेल्या नगरपालिका व नगरपंचायतींचे डीपी फक्त जीपीएस प्रणालीद्वारेच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 12:14 IST

नव्याने निर्माण झालेल्या नगरपालिकांचे व नगरपंचायतीचे विकास आराखडे यापुढील काळात केवळ भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे (जीआयएस) तयार केले जाणार आहेत.

ठळक मुद्देराज्याच्या नगर रचना विभागाच्या विविध उपक्रमांचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार नव्याने स्थापन १३६ नगरपंचायती आणि ५५ नगरपालिकांचे डीपी पुढील दोन वर्षांमध्ये

पुणे: राज्यात नव्याने निर्माण झालेल्या नगरपालिकांचे व नगरपंचायतीचे विकास आराखडे (डीपी) यापुढील काळात केवळ भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे (जीआयएस) तयार केले जाणार आहेत,अशी माहिती राज्याच्या नगररचना विभागाचे संचालक नो. र. शेंडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.त्याचप्रमाणे यापुढील काळात सर्व महापालिका व इतर नियोजन प्राधिकरणांचे डीपी जीपीएस प्रणालीद्वारे तयार केले जावेत,अशा स्पष्ट सूचनाही शासनाने दिल्या आहेत. राज्याच्या नगर रचना विभागाच्या 105 व्या वर्धापन दिनामित्ताने मुंबई येथे विविध उपक्रमांचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे केले जाणार आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत शेंडे बोलत होते. नगररचना विभागाने वर्धा, भंडारा, धुळे, नंदूरबार, उस्मानाबाद, परभणी, बीड, यवतमाळ, जालना यासह ठाणे, कोल्हापूर, सातारा, लातूर आणि नांदेडच्या प्रदेशासाठीच्या १७ प्रादेशिक योजना (आरपी)वर्षभारात पूर्ण करण्याची कामगिरी केली. त्यामुळे नव्याने स्थापन १३६ नगरपंचायती आणि ५५ नगरपालिकांचे डीपी पुढील दोन वर्षांमध्ये द्रतगती स्वरूपात तयार करण्याचे आदेश शासनाने दिल्याचे शेंडे यांनी सांगितले.जीआयएसच्या माध्यमातून विकास आराखडा तयार करताना उपलब्ध होणा-या माहितीचा साठा (डेटा) भविष्यात सरकारच्या नोंदणी व मुद्रांक विभाग, महसूल आणि इतर विभागांना वापरता येऊ शकतो,असे नमूद करून शेंडे म्हणाले,जीपीएस प्रणालीचा उपयोग करून नगरपंचायती व नगरपालिकांचे आराखडे निर्धारित वेळेत तयार केले जातील.त्याचप्रमाणे नागरिकांना राज्यातील मंजूर विकास आराखड्याचे भाग नकाशे (पार्ट प्लॅन) घेण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था किंवा नगररचना कार्यालयाकडे अर्ज करावा लागत होता.परंतु,पुढील काही दिवसांत नागरिकांना भाग नकाशे ऑनलाइन पध्दतीने उपलब्ध करून दिले जाणार आहेत. 

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस