नारायणगाव : नारायणगाव परिसरातील नगदवाडी येथे दोन तीन दिवसाच्या नवजात स्री जातीचे अर्भक प्लास्टिकच्या पिशवीत आढळून आले आहे. नारायणगाव पोलिसांनी या अर्भकाला नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. नवजात अर्भकास बेवारस म्हणून सोडणाऱ्या त्या असंवेदनशील आई वडिलांचा शोध पोलीस घेत आहे . ही घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगदवाडी येथील शिवशंकर मांडे यांच्या गोठ्यात काम करणाऱ्या रवी चव्हाण यांना नवजात बालक रडत असल्याचे आढळून आले. त्यांनी या आवाजाच्या दिशेने जात पाहणी केली असता अंदाजे दोन तीन दिवसाचे अर्भक प्लास्टिकच्या पिशवीत ठेवले असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी मांडे व इतर लोकांना या अर्भकाची माहिती दिली. या सर्वांनी आज-बाजूला बाळाच्या आई वडिलांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना त्याचा ठावठिकाणा लागला नाही. मांडेनी बाळाला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर या बाळाला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
प्लास्टिकच्या पिशवीत आढळले नवजात अर्भक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 14:04 IST
नारायणगाव परिसरातील नगदवाडी येथे प्लास्टिकच्या पिशवीत अर्भक आढळून आले आहे.
प्लास्टिकच्या पिशवीत आढळले नवजात अर्भक
ठळक मुद्देगोठ्यात काम करणाऱ्या रवी चव्हाण यांना नवजात बालक निदर्शनास