शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची नव्याने मतदार नोंदणी : डॉ. दीपक म्हैसेकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 20:28 IST

मतदार नोंदणीची प्रक्रिया ६ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार..

ठळक मुद्देमतदार नोंदणी प्रक्रिया सुरूप्रत्येक निवडणुकीसाठी नव्याने मतदार याद्या तयार केल्या जाणार

पुणे : राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या नवीन मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया १ ऑक्टोबरपासून सुरू केली आहे. याअंतर्गत यापूर्वी मतदार यादीत नाव असलेल्यांसह सर्वांना नव्याने नोंदणी करावी लागणार आहे. नव्याने नोंदणी केलेल्या मतदारांनाच प्रत्यक्ष मतदान करता येणार आहे. जुन्या मतदार याद्या रद्द समजण्यात येतील, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार १ ऑक्टोबरपासून मतदार नोंदणी सुरू झाली आहे. मतदार नोंदणीची प्रक्रिया ६ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. तर ३० डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाईल. सध्याची सदस्यांची मुदत जुलै २०२० मध्ये संपुष्टात येते. याविषयी अधिक माहिती देताना डॉ. म्हैसेकर म्हणाले, न्यायालयाच्या निर्णयानुसार यावर्षीपासून पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येक निवडणुकीसाठी नव्याने मतदार याद्या तयार केल्या जाणार आहेत. त्यामुळे यापूर्वी यादीत नाव असलेल्या प्रत्येकाने नव्याने नोंदणी करावी लागणार आहे. तसेच नवीन मतदारांनाही या प्रक्रियेत नोंदणी करता येईल. जुन्या याद्या रद्द होणार असल्याने या यादीतील मतदारांना मतदान करता येणार नाही. मतदार नोंदणी ६ नोव्हेंबरपर्यंतच करता येईल. त्यानंंतर आलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. सध्या विधानसभेची निवडणुक प्रक्रिया सुरू आहे. याच कालावधीत मतदारयाद्या कराव्या लागणार आहेत. त्यासाठी शालेय शिक्षण व उच्च शिक्षण विभागामार्फत जनजागृती केली जाणार आहे. तसेच विविध पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक शनिवारी सकाळी ११ वाजता घेतली जाणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघानिहाय मतदार नोंदणी अर्ज स्वीकारण्यासाठी अधिकाºयांची नेमणुक करण्यात आली आहे. तसेच तहसील कार्यालय व उपजिल्हाधिकारी कार्यालयातही अर्ज स्वीकारले जाणार आहेत. विभागीय आयुक्त हे विभागाचे मतदार नोंदणी अधिकारी असतील. तर पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.............पदवीधर मतदारसंघासाठी नमुना १८ तर शिक्षक मतदारसंघासाठी नमुना १९ हा मतदार नोंदणी अर्ज भरावा लागेल. अर्जाच्या छापील प्रती मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी इतर अधिकारी यांच्या कार्यालयात मिळतील. तसेच हस्तलिखित, टंकलिखित किंवा खासगी रीतीने छापलेले नमुनेही स्वीकारणार आहेत. संबंधित अर्ज आवश्यक कागदपत्रांसह संबंधित अधिकाºयांकडे व्यक्तिश: किंवा टपालाने जमा करता येईल. एकत्रित स्वरूपातील अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. केवळ कुटूंबातील सदस्यच असे अर्ज जमा करू शकतात.पदवीधर साठीची पात्रता  संबंधित व्यक्ती दि. १ नोव्हेंबर २०१९ पुर्वी किमान ३ वर्षे भारतातील कोणत्याही विद्यापीठाचा पदवीधर असले किंवा त्याच्याशी समकक्ष अर्हता धारण करीत असेल तर पात्र ठरेल. तीन वषार्चा कालावधी हा पदवी परीक्षेच्या निकालाच्यातारखेपासून ग्राह्य धरला जाईल.------------शिक्षकसाठी पात्रतासंबंधित व्यक्त दि. १ नोव्हेंबर २०१९ पूर्वीच्या सहा वर्षामध्ये कोणतीही तीन वर्षे कालावधीसाठी माध्यमिक शाळेच्या दजार्पेक्षा कमी दजार्ची नसलेल्या राज्यातील कोणत्याही संस्थेमध्ये अध्यापन केलेले असावे. -----------मतदार नोंदणीची प्रक्रिया- दि. १ ऑक्टोबर - मतदार नोंदणी सुचना प्रसिध्द- दि. ६ नोव्हेंबर - मतदार नोंदणी अर्जावरील दावे व हरकती स्वीकारण्याची अंतिम मुदत- दि. १९ नोव्हेंबर - हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई- दि. २३ नोव्हेंबर - प्रारूप मतदार याद्यांची प्रसिध्दी- दि. २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर - दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी- दि. २६ डिसेंबर - दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे- दि. ३० डिसेंबर - मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकVotingमतदान