शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
5
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
6
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
7
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
8
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
9
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
10
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
12
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
13
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
14
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
15
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
16
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
17
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
18
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
19
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
20
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप

पुणे महापालिकेत नवा विक्रम : एकाच दिवशी १२५ सेवक निवृत्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 20:16 IST

एकाच दिवशी एक, दोन प्रसंगी चार ते पाच कर्मचारी निवृत्त होण्याची वेळ महापालिकेसारख्या मोठ्या संस्थेवर अनेकदा येते. पण पुणे महापालिकेने मात्र नवा विक्रम प्रस्थापित केला असून एकाच दिवशी महापालिकेतले १२५ सेवक निवृत्त झाल्याचे दृश्य गुरुवारी बघायला मिळाले. 

ठळक मुद्देमहापालिकेतून निवृत्त झाले १२५ अधिकारी, कर्मचारी १ जून जन्मतारखेमुळे महासेवानिवृत्ती सन्मान सोहळा संपन्न

पुणे :   एकाच दिवशी एक, दोन प्रसंगी चार ते पाच कर्मचारी निवृत्त होण्याची वेळ महापालिकेसारख्या मोठ्या संस्थेवर अनेकदा येते. पण पुणे महापालिकेने मात्र नवा विक्रम प्रस्थापित केला असून एकाच दिवशी महापालिकेतले १२५ सेवक निवृत्त झाल्याचे दृश्य गुरुवारी बघायला मिळाले. 

      काही वर्षांपूर्वी ज्ञानाच्या अभावामुळे अनेकदा मूळ जन्मतारीख लक्षात ठेवली जायची नाही. त्याचा वापरही आतासारखा दाखल किंवा आधार कार्ड किंवा रिपोर्ट लिहिण्यासाठी केला जात नसे. त्यामुळे अनेकदा जन्मतारखेसारख्या महत्वाच्या मुद्द्याला फारसे महत्व नसायचे. मात्र शाळेत प्रवेश घेताना तारीख आणि वय टाकणे बंधनकारक असल्याने अडचण निर्माण होत असे. अशावेळी अनेकदा नव्या शैक्षणिक वर्षाची एक जूनतारीख टाकली जात असे. याचाच परिणाम म्हणजे प्रत्येक कार्यालयात मोठ्या संख्येने ३१ मे रोजी निवृत्त होणारे कर्मचारी असतात. पुणे महापालिकेतही हा अनुभव दरवर्षी  येत असून यंदा निवृत्तीच्या संख्येने शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा केला. 

    एखाद्या संस्थेतून ३५, ४० वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होणे ही ठरलेली गोष्ट आहे. मात्र तुम्ही सर्वजण सेवेतून निवृत्त झाला आहात, कामातून नाही, त्यामुळे पुढेही काम सुरू ठेवा, समाजकार्यात झोकून द्या, आपली आवड, छंद जोपासा असा सल्ला ज्येष्ठ उद्योगपती अरूण फिरोदिया यांनी यावेळी दिला.आयुष्यातील तीस वर्षांपेक्षा जास्त काळ महापालिकेत काढलेल्या या कर्मचाऱ्यांचा गळा यावेळी दाटून आला होता. महापालिका ही इमारत नाही तर आमच्या आयुष्याचा भाग बनल्याचे मतही अनेकांनी यावेळी व्यक्त केले. महापौर मुक्ता टिळक,  नगरसेवक गोपाळ चिंतल, मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर या वेळी उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका