शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

बारामती शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी नव्याने प्रस्ताव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 16:01 IST

ड्रोन कॅमेऱ्यांमुळे सण-उत्सवांमध्ये बंदोबस्त, व्हीआयपी दौरे, आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपयोगी असणार

ठळक मुद्देअर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजुरी मिळण्याची शक्यता ३२० अत्याधुनिक कॅमेरे व यंत्रणेसाठी ५ कोटींची मागणी मागील काही काळापासून रखडलेला प्रकल्प मार्गी लागणार सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण शहरावर नजर ठेवणारे सीसीटीव्ही कॅमेरे ही बारामतीची गरज

रविकिरण सासवडे - बारामती : शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी नव्याने राज्य शासनाच्या गृहमंत्रालयाकडे ५ कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या प्रस्तावास मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. या प्रस्तावानुसार शहरावर ३२० अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. त्यामुळे मागील काही काळापासून रखडलेला प्रकल्प मार्गी लागणार आहे. शैक्षणिक संस्था, एमआयडीसी परिसर, प्रमुख बाजारपेठ, विविध शासकीय कार्यालये व शहराचे असणारे सुमारे सव्वा लाख लोकसंख्या यामुळे सुरक्षिततेच्यादृष्टीने संपूर्ण शहरावर नजर ठेवणारे सीसीटीव्ही कॅमेरे ही बारामतीची गरज बनली आहे. वाढत्या गुन्हेगारी प्रकारांना आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही पोलीस प्रशासनाला उपयोगी पडणार आहेत. त्यासाठी नव्याने ५ कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनास पाठविण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत शहरात ३२० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यामध्ये २०० कॅमेरे कायमस्वरूपी असणार आहेत. उर्वरित १२० कॅमेºयांमध्ये फेस रिक्रनाईज कॅमेरा (एफआरसी), पॅरारोमिक कॅमेरा, पीटीझेड कॅमेरा, एएनपीआर (वाहन क्रमांक तपासणी कॅमेरा), ड्रोन कॅमेरे आदी असणार आहेत. हे सर्व कॅमेरे वायर वेब सिस्टीमद्वारे जोडण्यात येणार आहेत. .....सीसीटीव्हीमुळे होणारे फायदे...सुरक्षितता वाढेलमहिलांच्या छेडछाडीला आळा घालण्यास मदतचोरी, जबरी चोरी, दुचाकीचोरी, घरफोडी, दरोडा आदी गुन्ह्यांना आळा, तसेच तपासकामात गतिमानता येईल.गँगवॉर, टोळीद्वारे होणारे गुन्हे कमी होतील.गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल वाहतुकीचे नियमन होण्यास मदत.........बारामती शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक मार्गावर कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. फेस रिक्रनाईज कॅमेऱ्यांमुळे शहरात येणाऱ्या व्यक्तींच्या चेहऱ्याचे फोटो उपलब्ध होतील. त्यामुळे एखादी व्यक्ती गुन्हा करून शहराच्या कोणत्याही मार्गावरून पलायन करीत असेल तरीदेखील त्या व्यक्तीचा फोटो पोलीस प्रशासनाला उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तो फोटो आधारकार्ड वेबसाईटला लिंक केल्यास त्या व्यक्तीच्या नाव-पत्त्यासह इतर माहिती पोलिसांना मिळणार आहे. तसेच जास्त गर्दीच्या ठिकाणी पॅरारोमिक कॅमेरा ३६० कोनामध्ये फिरून त्या परिसराचे फुटेज घेईल. त्याचप्रमाणे एएनपीआर कॅमेऱ्यांमुळे गुन्ह्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या वाहनांच्या क्रमांकावरून त्या व्यक्तीचा तपास करणे शक्य होईल. पीटीझेड हे झोमिंग कॅमेरे असून सुमारे अर्धा किलोमीटरवरील दृश्य या कॅमेऱ्यांमध्ये झूम करून तपासता येणार आहेत. तसेच ड्रोन कॅमेऱ्यांमुळे सण-उत्सवांमध्ये बंदोबस्त, व्हीआयपी दौरे, आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपयोगी असणार आहेत. ..........बारामती शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करीत आहो  - नारायण शिरगावकर; उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग. 

टॅग्स :Baramatiबारामतीcctvसीसीटीव्हीAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार