शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

नवीन कांद्याच्या दरवाढीला ब्रेक

By admin | Updated: October 19, 2015 01:54 IST

गेल्या महिन्यातच कांद्याची आवक घटली होती. त्यामुळे किरकोळ बाजारात कांद्याचा दर किलोला ७० रुपयांपर्यंत पोहोचला होता. त्यातच पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून नवीन कांद्याची लागवडही लांबली होती

पुणे : गेल्या महिन्यातच कांद्याची आवक घटली होती. त्यामुळे किरकोळ बाजारात कांद्याचा दर किलोला ७० रुपयांपर्यंत पोहोचला होता. त्यातच पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून नवीन कांद्याची लागवडही लांबली होती. परिणामी कांद्याला भाव १०० रुपयांचा आकडा गाठणार आणि कांदा पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणणार, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, बाजारात नवीन कांद्याची आवक सुरू झाल्याने कांद्याच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. संगमनेर, खेड, आंबेगाव, श्रीगोंदा, नगर येथून ६० ट्रक नवीन कांद्याची, तर ३० ते ४० ट्रक जुन्या कांद्याची आणि २ ट्रक इजिप्त कांद्याची आवक झाली. घाऊक बाजारात नवीन कांद्याला प्रतिदहा किलोला १५० ते ३०० रुपये दर मिळाला, तर जुन्या कांद्याला २५० ते ३२० रुपये दर मिळाला. पाऊस आणि उष्णतेमुळे शेतातील भाजीपिकाचे नुकसान झाले असून नवरात्रोत्सवामुळेही काही प्रमाणात गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड येथे भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे भेंडी, कोबी, शेवगा, गाजर, मटार, कारली, तोंडली, गाजर, यांच्या दरात सुमारे दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.नवरात्रोत्सव सुरू असल्याने तांबडा भोपळा आणि सुरण यांना ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. उर्वरित भाजीपाल्याचे दर स्थिर आहेत, असे व्यापारी विलास भुजबळ यांनी रविवारी सांगितले.गुलटेकडी, मार्केट यार्र्ड येथील बाजारामध्ये रविवारी तब्बल १५०-१६० ट्रक इतकी आवक झाली. परराज्यांतून आलेल्या मालामध्ये कर्नाटक आणि मध्य प्रदेश येथून १४ ते १५ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक येथून ३ ते ४ ट्रक कोबी, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून ३ ते ४ टेम्पो शेवग्याची आवक झाली. पुणे विभागातून सातारी आल्याची ५०० ते ५५० पोती, बेंगलोरी आल्याची २०० पोती, फ्लॉवरची १४ ते १५ टेम्पो, कोबीची १० ते १२ टेम्पो, टोमॅटोची ५ ते ५५०० हजार पेटी, सिमला मिरचीची ८ ते १० टेम्पो, भुईमूग शेंगांची २०० ते २५० पोती, मटारची ५० ते ६० गोणी, तांबडा भोपळ्याची १० ते १२ टेम्पो, जुन्या कांद्याची ५ ते ६ ट्रक, नवीन कांद्याची ५० ते ६० ट्रक, इजिप्त कांद्याची २ ट्रक, तळेगाव, वाठार बटाट्याची सुमारे १० हजार गोणी, तर आग्रा, इंदौर येथून बटाट्याची ३० ते ३५ ट्रक, मध्य प्रदेश येथून लसणाची ३ हजार गोणींची आवक झाली. येत्या आठवड्यात नवीन कांद्याची आवक आणखी वाढणार आहे. परिणामी पुढील काळात कांद्याचे दर स्थिर राहतील, असे व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले.पालेभाज्यांना मागणी घटली; कोथिंबिरीच्या दरात वाढ नवरात्रोत्सव सुरू असल्याने पालेभाज्यांची मागणी घटली आहे. मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने मेथीच्या दरात शेकडा जुडीमागे एक हजार रुपयांनी, पालकच्या दरात प्रत्येकी ४०० रुपयांनी आणि अंबाडीच्या दरात २०० रुपयांनी घसरण झाली आहे. मात्र,कोथिंबिरीच्या दरात शेकडा जुडीमागे २०० रुपयांनी वाढ झाली आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड येथील बाजारात रविवारी कोथिंबिरीची सुमारे १ लाख २५ हजार जुडी, तर मेथीची ३० हजार जुडी आवक झाली. फळभाज्यांचे दहा किलोचे दर : कांदा जुना ३०० - ४००, नवा : २००-३००, इजिप्त २४०-३००, बटाटा : ८० - ११०, लसूण ५००- ९००, आले सातारी ३५०, बंगलोर : ३००, भेंडी ४००-४५०, गवार : गावरान ४००-५००, सुरती ४००-५००, टोमॅटो ८० -१२०, दोडका ३०० -४००, हिरवी मिरची १००-५५०, दुधी भोपळा १००-१८०, चवळी २०० -२५०, काकडी १२० -१८०, कारली : हिरवी ३०० -३५०, पांढरी १००- १८०, पापडी ३००-३५०, पडवळ १५० - १८०, फ्लॉवर ८० - १२०, कोबी ५०-१००, वांगी १५० -२००, डिंगरी २०० - २५०, नवलकोल १२०-१५०, ढोबळी मिरची १८०-२२०, तोंडली : कळी २२०-२५०, जाड : १०० -११०, शेवगा ५००-५५०, गाजर : २५०-२८०, वालवर ३००-४००, बीट ८० - १००, घेवडा ४००-४५०, कोहळा १००-१५०, घोसावळे १५० -२००, ढेमसे १६० -१८०, भुईमुग शेंग ३००-४००, मटार : स्थानिक ९००-१०००, पावटा ४०० -५००, तांबडा भोपळा ६०-१२०, सुरण २४०-२५०, नारळ १०००-१२००, मका कणीस शेकडा २००-३००, प्रति १० किलो : ६०-१००. पालेभाज्यांचे शेकड्याचे दर : कोथिंबीर ८०० - १२००, मेथी ५०० - १०००, शेपू ५०० - १०००, कांदापात ५०० - ८००, चाकवत ५०० - ६००, करडई ५०० - ६००, पुदिना ३००-३४००, अंबाडी ५००-६००, मुळा ५००-६००, राजगिरा ७००-८००, चुका ३०० - ५००, चवळई ७०० - ८००, पालक ६००-८००.