शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
5
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
6
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
7
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
8
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
9
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
11
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
12
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
13
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
14
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
15
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
16
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
17
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
18
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
19
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
Daily Top 2Weekly Top 5

शिव महोत्सवामुळे नवीन पिढीला योग्य दिशा

By admin | Updated: March 25, 2015 00:32 IST

शिव महोत्सवामुळे छत्रपती शिवाजीमहाराजांचा इतिहास नव्याने तरुणांसमोर येईल; नवीन पिढीला योग्य दिशा मिळेल, असा विश्वास शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.

बिबवेवाडी : शिव महोत्सवामुळे छत्रपती शिवाजीमहाराजांचा इतिहास नव्याने तरुणांसमोर येईल; नवीन पिढीला योग्य दिशा मिळेल, असा विश्वास शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.राजमाता प्रतिष्ठान व एकरूप मित्र मंडळाच्या वतीने सहाव्या शिव महोत्सवात ते बोलत होते. या महोत्सवाचा सोमवारी समारोप झाला.शिवसेनेच्या विचारांना जनशक्तीने साथ दिल्यामुळेच राज्यात व दिल्लीत बदल घडवून शिवसेना सत्तेत आली, असे मत राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, की राजकीय फायद्यासाठी तरुणांना व्यसनाधीन करणे ही शिवसेनेची संकृती नाही. मागच्या निवडणुकीमध्ये धनशक्तीचा पराभव करून जनशक्तीचा विजय झाला.संदीप चव्हाण यांचे शिवाजीमहाराजांचा इतिहास सांगणारे व्याख्यान झाले. कार्यक्रमाला महापौर दत्तात्रय धनकवडे, नगरसेविका कल्पना थोरवे, संभाजी थोरवे, निर्मला केंडे, अशोक हरणावळ, फुलचंद चाटे, शशिकांत कांबळे, बाळासाहेब धोका, अनंता चव्हाण, दादा कोंढरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाला सुरुवात४चंदननगर : चंदननगर भाजी मार्केटमधील श्री शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण व नूतनीकरण करण्याच्या कामांचे भूमिपूजन माजी आमदार बापूसाहेब पठारे, नगरसेवक महेंद्र पठारे व नगरसेविका संजिला पठारे यांच्या हस्ते करण्यात आले.४या कामासाठी नगरसेवक महेंद्र पठारे व संजिला पठारे यांच्या विकास निधीतून तरतूद करण्यात आली आहे. वीस वर्षांपूर्वी हा पुतळा उभारण्यात आला आहे. त्यामुळे त्याचे सुशोभीकरण व नूतनीकरण करणे गरजेचे होते, अस मत पठारे यांनी व्यक्त केले. यशवंत चव्हाण, संतोष बोराटे, राहुल पठारे, बाळासाहेब चांधरे, मधुकर पठारे, विनोद पठारे, मनोज पाचपुते, किरण खैरे, सुधीर राहणे, गणेश थोरात, स्वप्निल कटके, सुहास तळेकर व गौरव राजगुरू या वेळी उपस्थित होते.४धनकवडी : भारती विद्यापीठ परिसरातील कै. हनमंतराव थोरवे शाळेच्या प्रांगणात आयोजित शिव महोत्सव उत्साहात झाला. मान्यवरांनी छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याचे पूजन केले. या प्रसंगी ‘भगवा’ हे महानाट्य सादर करण्यात आले. ४नगरसेविका कल्पना थोरवे तसेच राजमाता प्रतिष्ठानचे अ‍ॅड. सभांजी थोरवे यांनी महोत्सव भरविला होता. अध्यक्षस्थानी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, सत्यवान उभे, विनायक निम्हण, दत्तात्रय धनकवडे, डॉ. अमोल कोल्हे, निर्मला केंडे, सचिन तावरे, सुवर्णा पायगुडे, मोहिनी देवकर उपस्थित होत्या. डॉ.कोल्हे म्हणाले,‘‘आजच्या पिढीला हिंदू संस्कृतीचा इतिहास माहिती होणे आवश्यक आहे.’’