शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

सामुदायिक विवाहातून पुण्यातील कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतीने घातला नवा आदर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 11:49 AM

एकीकडे लग्न आणि त्यावर होणारा वारेमाप खर्च, हुंडा आदी समस्या असताना दुसरीकडे कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतीने नवा आदर्श घालून देत सामुदायिक विवाह सोहळा पुण्यात आयोजित केला होता. यात सहभागी तिनही जोड्यांनी समान खर्च केला. 

ठळक मुद्दे२१ जानेवारी रोजी सत्यशोधक पद्धतीने झाला तिन्ही जोड्यांचा विवाहमहात्मा ज्योतीराव फुले यांनी घडवून आणला देशातील पहिला सत्यशोधक विवाह

पुणे : एकीकडे लग्न आणि त्यावर होणारा वारेमाप खर्च, हुंडा आदी समस्या असताना दुसरीकडे कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतीने नवा आदर्श घालून देत सामुदायिक विवाह सोहळा पुण्यात आयोजित केला होता. यात सहभागी तिनही जोड्यांनी समान खर्च केला. १९९३ साली स्थापन झालेली कागद, काच, पत्रा, कष्टकरी पंचायत संघटना पुणे व पिंपरी-चिंचवड या शहरांमधील कचरावेचकांची एक कामगार संघटना आहे. संघटना १० हजाराहून अधिक कचरावेचकांसह कार्य करते. सभासदांच्या सामाजिक, आर्थिक व आरोग्याच्या समस्या सोडविण्याबरोबरच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करते. यावर्षी संघटना रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. त्या निमित्ताने वर्षभर निरनिराळे कायक्रम आयोजित केले आहेत. या मालिकेतील सामुदायिक विवाह सोहळा हा दुसरा कार्यक्रम हमाल भवन, मार्केट याड येथे दि. २१ जानेवारीला झाला. सामुदायिक विवाह सोहळ्यात भाग घेणाऱ्या तिन्ही जोड्यांनी विवाह, हॉल, जेवण इत्यादींचा खर्च मिळून केला.सामुदायिक विवाहाविषयी संघटनेच्या सभासद सरूबाई म्हणाल्या, की माझ्या मुलाचे लग्न मागील सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये झाले होते. त्यामुळे नातेवाईकांच्या मुलीचे लग्न पण या सोहळ्यात करायचे ठरवले. अतिशय आनंद होत आहे, की संघटनेच्या २५व्या वर्षी मी पुन्हा या विवाहसोहळ्यामध्ये सहभागी झाले.२१ जानेवारी रोजी तिन्ही जोड्यांचा विवाह सत्यशोधक पद्धतीने झाला. विवाह समारंभावर होणारा वायफळ खर्च, पैशाची उधळपट्टी, त्यामुळे मुलीच्या कुटुंबावर होणारा कर्जाचा बोजा, आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन देण्याकरिता, प्रेमविवाह आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बालविवाह व हुंडाप्रथा रोखण्याकरिता या सर्व बाबी लक्षात घेऊन या सोहळ्याची आखणी करण्यात आली होती. यामध्ये दोनही कुटुंबाने लग्नाचा खर्च समान केला.देशातील पहिला सत्यशोधक विवाह महात्मा ज्योतीराव फुले यांनी घडवून आणला. पुरोहितांशिवाय लावलेला हा विवाह २५ डिसेंबर, १८७३ रोजी पार पाडला. या विवाहाचा खर्च स्वत: सावित्रीबाई फुले यांनी केला होता. यामध्ये सत्यशोधक पद्धतीने जोडप्यांनी शपथ घेतली. आपल्या सर्वांच्या साक्षीने आम्ही दोघे एकमेकांचा जीवनसाथी म्हणून स्वीकार करीत आहोत. त्रुटी कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहू. आम्ही परस्परांचे नातेवाईक व मित्रपरिवार यांचा आनंदाने स्वीकार करीत आहोत. तसेच कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना आम्ही आमची सामाजिक जबाबदारी पार पाडू. तसेच समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय वृद्धिंगत होण्यासाठी प्रयत्नशील राहू. माझ्या जीवनसाथी सोबत कोणत्याही प्रकारची हिंसा करणार नाही, दारूपासून दूर राहीन, मुलांचा सांभाळ चांगल्या प्रकारे करीन, अशी प्रतिज्ञाच जोडप्यांनी केली.अक्षता म्हणून धान्याऐवजी फुलांच्या पाकळ्या वापरल्या. एकीकडे काही लोक असे आहेत, जे एकावेळी उपाशीपोटी झोपतात आणि प्रत्येक लग्नात सरासरी १० किलो धान्य आपण अक्षता म्हणून टाकतो. आपल्या देशात दरवर्षी २५ कोटी लग्न होतात. तर २५० कोटी धान्य वाया जाते. म्हणून अक्षतासाठी वाया जाणारे धान्य वाचवून संघटनेने साधना व्हिलेज या मानसिक विकलांगसाठी काम करणाऱ्या संस्थेला देणगी म्हणून दिले.  या विवाहसोहळामध्ये कचरावेचकांची पुढच्या पिढीतील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन सजावट, जेवण वाढणे अशा अनेक कामांना मदत केली. वरातीमध्ये नाचण्याचा आनंदही घेतला.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड