शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

स्वारगेट प्रकरण: ‘ती’ मेल्यागत पडून राहिली अन् ‘तो’ अत्याचार करत होता; बचावासाठी ओरडली, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 06:26 IST

त्याच्याकडे याचना: काय करायचे ते कर, पण मला जीवंत ठेव...

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय युवतीवर बलात्कार करणारा नराधम दत्तात्रय गाडे हा पुणे पोलिसांनी अटकेत आहे. या घृणास्पद घटनेनंतरही आरोपीला त्याच्या कुटुंबीयांकडून  पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, मंगळवारी (दि. २५) घडलेल्या अत्याचारावेळी आरोपीने आपल्याला जिवंत सोडावे, यासाठी पीडितेने त्याला गयावया केल्याची माहिती समोर आली आहे.

पीडितेला आपण बसमध्ये कंडक्टर असल्याचे खोटे सांगून आरोपी तिला घेऊन गेला. ती बसमध्ये जाताच त्याने बसचा मुख्य दरवाजा आणि चालक व प्रवाशांमध्ये असलेला दुसरा दरवाजाही बंद केला. त्यानंतर पीडितेने बसमध्ये कोणीच नाहीये, मला खाली जायचे आहे, मला खाली जाऊ दे, अशी विनवणी केली. त्यानंतर आरोपीने पीडितेला बसच्या सीटवर ढकलून दिले. पीडितेने मदतीसाठी आवाजही दिले; मात्र आरोपीने तिचा गळा दाबला. आरोपीने आपल्याल जिवंत सोडावे यासाठी ती बचावाच्या प्रयत्नात होती.

आरोपीच्या खात्यात महिनाभरापासून २४९ रुपये

स्वारगेट बसस्थानकातील अत्याचार प्रकरणात आरोपीचे वकील न्यायालयात संगनमताने हा प्रकार झाल्याचे सांगतात. त्यावेळी आरोपी दत्तात्रय याने काही पैसे दिल्याचेदेखील सांगितले गेले. तपासात मात्र आरोपीच्या बँक खात्यात घटनेपूर्वी महिनाभरापासून केवळ २४९ रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी अशा परिस्थितीत कुठून पैसे देईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पोलिसांनी तपासले दोघांच्या मोबाइलचे २ वर्षांचे सीडीआर

पुणे पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर आरोपी दत्तात्रय आणि पीडितेच्या मोबाइलचे दोन वर्षांचे सीडीआर डिटेल्स तपासण्यात आले आहेत. त्यात कुठेही संबंधित आरोपी आणि पीडिता हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचे दिसून न आले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

त्याच्याकडे याचना : काय करायचे ते कर, मला जीवंत ठेव...  पीडिता घाबरली आहे, ती प्रतिकार करत नसल्याचे लक्षात येताच नराधमाने दुसऱ्यांदा तिच्यावर अत्याचार केल्याची बाब याप्रकरणात समोर आली. तिने काय करायचे ते कर पण मला जिवंत ठेव, अशी याचना नराधमाकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

आरोपी दत्तात्रय बसमधून उतरल्यानंतर पीडितेने बसने गावाला जात असताना तिच्या मित्राला आणि बहिणीला फोनद्वारे तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. त्यांनी पीडितेला धीर देत स्वारगेट पोलिस ठाण्यात जात आरोपीविरोधात तक्रार देण्याचे सांगितल्यानंतर तिने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. 

टॅग्स :swargate bus depotस्वारगेट बसस्थानक