सासवड : पुरंदरला आंतरराष्ट्रीय विमानतळाची घोषणा झाल्यापासून प्लॉट आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अमुक किमी जवळ असल्याच्या जाहिराती, फ्लेक्स, पत्रके आदींद्वारे पुरंदर तालुक्यातील सासवड, जेजुरीसह पुणे शहरातही झळकत असल्याचे दिसत आहेत, विमानतळ होण्याची चाहूल लागताच प्लॉट विक्रेत्यांची भाषा यानिमित्ताने बदलल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. यापूर्वी घरे, बंगल्यांसाठी गुंठेवारीचे प्लॉट विक्री करण्यासाठी एनए प्लॉट, निसर्गरम्य ठिकाण, रिव्हर व्ह्यूू, लेक व्ह्यूू, जेजुरी, नारायणपूर, बालाजी मंदिरापासून जवळ, एसटी स्टँड, भाजीमंडई, शाळा, महाविद्यालये, मुख्य रस्त्यापासून जवळ, हाकेच्या अंतरावर अशा विविध प्रकारे प्लॉट विक्रेते जाहिरात करीत असत. मात्र आता पुरंदरला आंतरराष्ट्रीय विमानतळाची घोषणा झाल्यापासून प्लॉट आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अमुक किमी जवळ असल्याच्या जाहिराती फ्लेक्स, पत्रके आदींद्वारे पुरंदर तालुक्यातील सासवड, जेजुरीसह पुणे शहरातही झळकत असल्याचे दिसत आहे. याबरोबरच, विमानतळाची घोषणा झाल्यापासून पुरंदरच्या गावोगावांत जमीन खरेदी-विक्री करणाऱ्या अनेक एजंट, दलालांचा सुळसुळाट झाला आहे. गावातील काही एजंटांना सोबत घेऊन आपल्या आलिशान चारचाकीतून हे एजंटलोक रानोमाळ फिरताना दिसत आहेत. पुरंदरच्या पूर्व भागातील काही गावांत तर जी गावे बाधित नाहीत अशा गावांत काही एजंटांनी जाऊन तुमची जमीन शासकीय दरात शासन घेणार असून, शासनाच्या दरापेक्षा जास्त दराने पैसे देतो म्हणून खरेदीखत केल्याच्या घटनाही झाल्या आहेत.
नव्या विमानतळाचे वारे; संधीसाठी सरसावले सारे
By admin | Updated: October 15, 2016 05:59 IST