शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

ना मुहूर्त, ना सप्तपदी; देवाची आळंदी बनतेय ‘लग्नाळूंचे हब’

By सायली जोशी-पटवर्धन | Updated: February 9, 2023 11:00 IST

घरात मान्यता नसल्याने, आंतरजातीय विवाह करायचा असल्याने, घरातून पळून आलेली अशी असंख्य जोडपी आळंदीत दिवसागणिक लग्न करतात.

सायली जोशी-पटवर्धन / भानुदास पराड -

पुणे : लग्न लावून देणाऱ्या एजंटला ५ ते १० हजार रुपये द्यायचे, तासाभराचा विधी करायचा आणि ज्ञानेश्वर माउलींच्या समाधीचे दर्शन घेऊन आयुष्यभर एकमेकांच्या सोबतीने राहायचा निश्चय करायचा, इतकी सोपी ही प्रक्रिया. म्हणूनच देवाची आळंदी अशी जगभरात ओळख असलेल्या या शहराची आता ‘लग्नाचे हब’ अशी नवी ओळख बनली आहे. यात लग्न इंटरकास्ट असो की दुसरे-तिसरे, कमीत कमी खर्चात झटपट लग्न लावून देण्यासाठीची यंत्रणा आळंदीत कार्यरत आहे.

एकीकडे ज्ञानेश्वर माउलींचा गजर, तर दुसरीकडे पावलोपावली मंगल कार्यालये, धर्मशाळा आणि लग्न लावून देणाऱ्या एजंटची कार्यालये. येथे गुरुजी पाहावा लागत नाही ना फोटोग्राफर. लग्न करण्यासाठी अगदी अक्कलकोट, पालघर, मुंबई, औरंगाबाद असे राज्याच्या कानाकोपऱ्यातून जोडपी येतात.

अनेक जाेडपी पळून आलेली घरात मान्यता नसल्याने, आंतरजातीय विवाह करायचा असल्याने, घरातून पळून आलेली अशी असंख्य जोडपी आळंदीत दिवसागणिक लग्न करतात.

आधार कार्ड, पॅन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला आणि राहत्या पत्त्याचा पुरावा ही कागदपत्रे लग्नासाठी  मागतो. रीतसर लग्न झाल्यावर जोडप्याला प्रमाणपत्र देतो. परिस्थिती नसेल तर पैसे न घेताही लग्न लावून देतो.- युवराज ढाके, प्रमुख, मंगल संस्था

मी दोन वर्षांपूर्वी बीडहून आलो. आता अशी लग्न लावण्याबरोबरच वास्तुशांती, उदक शांत, पूजा-पाठ अशी कामे करतो. सुरुवातीला आम्ही एक साखरपुडा विधी करतो. पाहुणे, कपडे बदला-बदली, वाजंत्री असे काहीच नसल्याने हे सगळे अवघ्या अर्धा ते पाऊण तासात होते. मुहूर्तही पाहिला जात नाही. दिवसाला साधारण ४ ते ५ लग्न लावतो.- एक गुरुजी (नाव न छापण्याच्या अटीवर)

आळंदीत लहान-मोठी मिळून एकूण १५० कार्यालये आहेत, तर ५०० धर्मशाळा आहेत. दिवसाला साधारण १०० ते १५० लग्न होतात. दिवसेंदिवस लग्नाचे प्रमाण वाढत आहे.- ज्ञानेश्वर वीर, प्रमुख व्यवस्थापक, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी

टॅग्स :marriageलग्नAlandiआळंदी